मुंबई : 'बिग बॉस ओटीटी' या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी जावेद (Urfi Javed)  अनेक कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या हटके आऊटफिट्समुळे तर कधी फोटो, व्हिडिओमुळे ती चर्चेत असते. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फी जावेदसोबत (Urfi Javed)  ब्लॅकमेलिंग झाल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. या संदर्भातली पोस्ट देखील तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेदने (Urfi Javed)  तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच दुसऱ्या फोटोमध्ये उर्फीने (Urfi Javed black mailing) अनेक व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. उर्फी जावेदच्या या पोस्टनुसार, ही चॅट या व्यक्तीसोबत करण्यात आली होती. तसेच या पोस्टच्या कॅप्शनला भली मोठी पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये तिने संबंधित पोस्टमधील व्यक्तीवर ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप केला आहे. 


पोस्टमध्ये काय म्हणाली?
उर्फीने (Urfi Javed black mailing) या पोस्टमध्ये लिहिले आहे, हा माणूस मला इतके दिवस त्रास देत होता. 2 वर्षांपूर्वी कोणीतरी माझ्या फोटोशी छेडछाड करून तो शेअर करायला सुरुवात केली. 2 वर्षांपूर्वी मी त्याबद्दल पोलिसातही तक्रार दाखल केली होती. या दरम्यान मी खूप वाईट काळातून गेल्याचा अनुभव ती सांगते.  


उर्फी पोस्टमध्ये (Urfi Javed black mailing) पुढे म्हणते की, "मी 2 वर्षांपूर्वी एक पोस्ट केली होती जी अजूनही माझ्या प्रोफाईलवर आहे. हा माणूस मला 'त्या' फोटोच्या बदल्यात सेक्स व्हिडिओ बनवण्यासाठी ब्लॅकमेल करत होता. अन्यथा तो म्हणाला की, तो ते फोटो अनेक बॉलीवूड पेजेसला देईल आणि माझे करिअर बरबाद करेल.  तो मला सायबर बलात्कार करण्यासाठी ब्लॅकमेल करत होता, असा आरोप तिने केला आहे. 


मुंबई पोलिसांबद्दल काय म्हणाली?
यासोबतचं उर्फी (Urfi Javed)  पुढे म्हणाली की, या घटनेने मी निराश झाले नाही, मी प्रथम गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 14 दिवस झाले, अद्याप कारवाई नाही! मी खूप निराश झाले असल्याची भावना ती व्यक्त करतेय.   


दरम्यान मुंबई पोलिसांबद्दल अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण त्यांचा या माणसाबद्दलचा दृष्टिकोन विचित्र असल्याचे ती म्हणतेय. तसेच त्याने किती महिलांवर हे कृत्य केले हे सांगूनही कारवाई झाली नाही. असो, हा माणूस समाजासाठी, स्त्रियांसाठी धोका आहे. त्याला मुक्तपणे जगू देऊ नये, अशी अपेक्षा तिने या पोस्टच्या शेवटी व्यक्त केली आहे. 


उर्फीच्या (Urfi Javed)  या पोस्टवरून आता या ब्लॅकमेलरला पोलिस अटक करतात की तो असाच मोकाट फिरतो, हे येत्या काळात आपल्याला कळणार आहे.