Urfi Javed : उर्फी दुबईत गेली अन् फसली, दुबई पोलीसांनी घेतलं ताब्यात
Urfi Javed चा बाजार उठला, उर्फी जावेदच्या अडचणी वाढल्या...
Urfi Javed: सोशल मीडिया सेन्सेशनल उर्फी जावेदने (Urfi Javed) तिच्या अतरंगी स्टाईलने स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा तिच्या स्टाईलचे सोशल मीडियावर (Social Media) कौतूक केले जाते तर अनेकदा तिला नेटकरी ट्रोल देखील करतात. तिला तिचे ही स्टाईल (Style) एके दिवशी तुरुगांत घेऊन जाईल याचा तिनं स्वप्नात ही विचार केला नसेल. हाती आलेल्या माहितीनुसार उर्फी जावेदला तिच्या चित्रविचित्र कपड्यांच्या स्टाईलमुळे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रकरण नेमकं काय?
उर्फी शूटसाठी दुबईत गेली होती. दुबईमधील (Dubai) तिच्या शूटला मात्र वेगळं वळण मिळालं. बोल्ड कपडे घालत उर्फी शूट करायला तयार झाली होती. नेहमीप्रमाणे तिच्या बोल्ड आउटफिटमुळे ती अडचणीत आली. पण या वेळेस उर्फी मुंबईत नव्हती तर दुबईला होती. दुबईत सार्वजनिक ठिकाणी बोल्ड (Bold) कपडे घालून उर्फीला शूट (Shoot) करण महागात पडलं. त्या परिसरातील काही लोकांनी तिच्या कपड्यांवर आक्षेप नोंदविला. आणि मग तेथील स्थानिक पोलिसांनी उर्फीला ताब्यात घेणं योग्य समजले. पण हे प्रकरण ते नसून खुद्द उर्फीनं या प्रकरणावर खुलासा केला आहे.
उर्फीचा खुलासा
दुबईत ज्या ठिकाणी उर्फीचे शूट होते त्याठिकाणी पोलीस सेटवर आली होती. तिच्या बोल्ड कपड्यांमुळे नाही असं तिने सांगितले. पोलीस (Police) सेटवर शूटिंग थांबवण्यासाठी आली होती कारण लोकेशनची समस्या असल्या कारणाने पोलिसांना सेटवर येऊन शूट थांबवावे लागले. आम्हाला शूटिंग करण्यासाठी मर्यादित वेळ देण्यात आली होती, कारण ती शूटिंग सार्वजनिक ठिकाणी होती. प्रॉडक्शन टीमने वेळ वाढवून घेतली नव्हती, त्यामुळे आम्हाला तिथून निघावं लागलं. जेवढी शूटिंग बाकी होती, ती आम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण केली. सेटवर पोलिसांचं येणं आणि माझे कपडे यांचा काहीच संबंध नव्हता”, असं उर्फीनं स्पष्ट केलं.