Urfi Javed Viral Video: उर्फीचा ड्रेस पाहून जॅकेटनं तिचं अंग झाकायला आली तरुणी अन्...
उर्फी जावेदच्या (Urfi Javed) नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी नेहमीप्रमाणे आपल्या अतरंगी कपड्यांमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आली असताना एक मुलगी जॅकेट घेऊन उर्फीसमोर आली आणि जॅकेट तिच्या अंगावर टाकू लागली. यानंतर जे झालं ते फारच थक्क करणारं होतं.
Urfi Javed Viral Video: उर्फी जावेद (Urfi Javed) अनेकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा तर तिचे कपडे इतके वेगळे असतात ती नेमकं तिने हे काय परिधान केलं आहे हे सांगणंही कठीण होतं. असाच काहीसा प्रकार नुकताच मुंबईमध्ये (Mumbai) घडला. उर्फी वांद्रे (Bandra) येथील एका रेस्तराँरंटबाहेर आली तेव्हा तिच्या भोवती चाहत्यांची गर्दी गोळा झाली. प्रसारमाध्यमांमधील काही कॅमेरामनने तिची झलक कॅमेरात टीपण्यासाठी आले. नेहमीप्रमाणे उर्फीने अगदी नावापुरते कपडे (Urfi Javed Clothes) परिधान केले होते. उर्फी कॅमेरामन्ससमोर पोज देत उभी होती. त्याचवेळी एक मुलगी उर्फीच्या दिशेने चालत आली आण तिने हातामधील कोट उर्फीच्या अंगावर टाकत तिचं अंग झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकारामुळे उर्फी चांगलीच संतापली.
सटल मेकअर आणि हेअरस्टाइल
या व्हिडीओमध्ये उर्फीने एक अशी ब्रा परिधान केली आहे की ज्यामध्ये आइस्क्रीमच्या कोनसारखा आकार वापरण्यात आला आहे. उर्फीने हा ब्रा आणि ब्लॅक वेलवेट लाँग स्कर्ट परिधान केला होता. आपल्या लूकला शोभणारा केसांचा बन तिने बांधला होता. तिचा मेकअपही फारच सटल होता. उर्फी रेस्तराँरंटच्या दारासमोरच उभी असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हसून ती फोटोग्राफरकडे पाहत असतानाच एक विचित्र प्रकार घडला.
नेमकं घडलं काय?
रेस्तराँरंटच्या दारासमोरच उर्फी फोटोग्राफर्सला पोज देत उभी होती. फोटोग्राफरही पटापट तिचे फोटो काढत होते. त्यावेळी उर्फीचे कपडे पाहून तिचे अंग झाकण्यासाठी एक महिला हातात जॅकेट घेऊन तिच्या दिशेनं चालत आली. तिने उर्फीला जॅकेट घालण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी उर्फीकडे आली आणि तिला जॅकेट घालू लागली तेव्हा उर्फीने तिचा हात पकडला. त्यानंतर रागातच उर्फी या मुलीकडे पाहू लागली. उर्फीचा संतापलेला चेहरा पाहून कोट घालण्यासाठी आलेली ही मुलगी मागे सरकली.
ती मुलगी कोण?
यानंतर उर्फी पुन्हा रेस्तराँरंटमध्ये निघून गेली. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून समोर आलेल्या माहितीनुसार उर्फीला कोट घालण्यासाठी आलेली मुलगी ही उर्फीच्या स्टाफ मेंबर्सपैकी एक होती.
मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत
उर्फी जावेद ही मागील काही आठवड्यांपासून राज्यातील राजकारणामध्येची चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांसंदर्भात आपेक्ष नोंदवत कारवाई करण्याची मागणी केली होती. यावरुन उर्फीनेही त्यांना उत्तर दिलं होतं. हा वाद बराच रंगाला होता.