Urfi Javed Want's To Get Married to Shahrukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan)  हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट कमाईच्या बाबतीत रोज नवे रेकॉर्ड बनवत आहे. अनेक सेलिब्रिटी चित्रपट पाहत असल्याचे समोर आले आहे. त्यावर सेलिब्रिटींनी विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. या सगळ्यात 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) तर चक्क शाहरुखला लग्नासाठी विचारणा केली आहे. तिला शाहरुखची दुसरी पत्नी व्हायचे आहे. असा खुलासा उर्फीनं कॅमेऱ्यासमोर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेद नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. या दरम्यान, पापाराझींनी तिला पठाण संबंधीत काही प्रश्न विचारले आणि त्यासोबतच चित्रपटाला बॉयकॉट करत आहेत त्या लोकांना काय बोलणार? यावर उत्तर देत उर्फी म्हणाली, 'मला बॅन करा, पण शाहरुख खानचे चित्रपट पाहा.' त्यानंतर शाहरुख खानसाठी काय सांगशील असं विचारता उत्तर देत उर्फी म्हणाली, 'शाहरुख खान माझं तुझ्यावर प्रेम आहे. कृपया मला तुझी दुसरी पत्नी बनव.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'पठाण'ने गाठला 300 कोटींचा टप्पा


चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, भारतात 'पठाण'ने 34 ते 36 कोटींची कमाई केली आहे. सुट्टीचा दिवस नसल्याने ही कमाई फार काही मोठी नाही. पण चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी केलेली कमाई पाहता हा आकडा फार कमी आहे. तिसऱ्या दिवसाच्या कमाईत पठाण चित्रपट आमीर खानच्या दंगल, बाहुबली २ आणि केजीएफ२ ला मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे. शाहरुखच्या या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत आहेत. 


हेही वाचा : Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor मध्ये जुंपली, एकमेकांबद्दल संताप व्यक्त करत म्हणाले...


पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली. यासह 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला इतकी मोठी सुरुवात मिळालेली नाही. दरम्यान जगभरातील कमाईचा आकडा 106 कोटी होता. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा घेत पठाणने दुसऱ्या दिवशी 70 कोटी कमावले. यासह जगभरातील कमाईचा आकडा 235 कोटींवर पोहोचला. तीन दिवसात पठाणने 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. शाहरुख खानच्या पठाणने आतापर्यंत 21 नवे रेकॉर्ड केले आहेत. कोविडनंतर पठाण पहिला चित्रपट आहे, ज्याने सलग दोन दिवस इतकी कमाई केली आहे.