मुंबई : 'बिग बॉस ओटीटी' फेम अभिनेत्री उर्फी जावेद काही महिन्यांपासून सतत लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. याचं कारण म्हणजे सतत समोर येणारा तिचा बोल्ड लूक. तसं, आम्‍ही तुम्‍हाला आता जे फोटो  दाखवणार आहोत, ती साडी नेसूनही ती बोल्डनेस क्वीनचे बिरुद राखू शकते हे उर्फीने सिद्ध केलं आहे. खरंतर, यावेळी उर्फीसोबत असं काही घडलं, जे तिला माहीतही नव्हतं. कारण साडीत पोज देताना ती जोराच्या वाऱ्यामुळे ओप्स मोमेंटची शिकार झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेरेसवर देत होती पोझ
खरंतर उर्फी जावेदने काही वेळापूर्वी तिचे फोटो स्वतःच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाची साडी आणि बोल्ड ब्लाउजमध्ये दिसत आहे. ती टेरेसवर पोज देत आहे. पण या फोटोशूटदरम्यान जोरच्या हवेमुळे तिच्या साडीचा पदर उडत आहे.  तिचे हे फोटो पाहून तुम्हीही उर्फीचे कौतुक कराल की, तिने ही समस्या अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. 



या दोन फोटोंसोबत उर्फीने या गेटअपमधील आणखी काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती प्रत्येक फोटोत परफेक्ट दिसतेय.  या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, 'हवेच्या प्रवाहामुळे शूटचं सत्य' यासोबत तिने एक लक्षवेधी इमोजी बनवली आहे. फोटोत तिचे केस खूप उडत आहेत आणि तिचा चेहरा खूप घाबरलेला दिसत आहे. इतर फोटोंमध्ये ती ग्लॅमर स्टाईलमध्ये दिसत आहे.