मुंबई : 'उरी' स्टार विक्की कौशल सध्या अभिनेत्री कतरिना कैफला डेट करण्यामुळे चर्चेत आहे. नुकताच अनिल कपूरचा मुलगा अभिनेता हर्षवर्धन कपूरने एका मुलाखती दरम्यान विकी आणि कतरिनाच्या नात्याबद्दल मोठं विधान केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर विकीने आता नवीन लक्झरी कार रेंज रोव्हर खरेदी केली आहे. विक्कीने गाडीसह आपला फोटो शेअर केला आणि वेलकम होम दोस्त अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करताच सेलिब्रेटी आणि त्यांचे चाहते सतत त्याचं अभिनंदन करत आहेत.



विक्की कौशलने खरेदी केलेल्या लक्झरी कारची किंमत 2.50-4.50 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी कार्तिक आर्यनने एक आलिशान लॅम्बोर्गिनी खरेदी केली होती, ज्याची किंमत साडेचार कोटी रुपये आहे. विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आणि भूमी पेडणेकर 'लेले' या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय त्याच्याकडे इम्मॉर्टल अश्वतथामा आणि सॅम बहादूर हे चित्रपट आहेत.


बर्‍याच दिवसांपासून कतरिनाला डेट करत आहे
कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या डेटींगच्या बातम्या जवळपास दोन वर्षांपासून येत आहेत पण त्या दोघांपैकी अद्याप त्यांचा रिलेशनशिपबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. कतरिना आणि विकी बर्‍याचवेळा एकमेकांच्या घराबाहेर स्पॉट झाले आहेत. अनेकवेळा दोघांनाही अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं आहे.


इतकंच नव्हे तर नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी हे कपल एकत्र सुट्टीवर गेले होते. यादरम्यान कतरिनाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता ज्यात विक्की कौशल देखील दिसला होता. मात्र त्यांच्या डेटिंगच्या बातमीची माहिती मिळताच युजर्सनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. यानंतर काही वेळातच कतरिनाने तिची पोस्ट हटवली.