मुंबई : उर्मिला आणि आदिनाथ कोठारे ही मराठी सिनेविश्वातील क्युट कपल्सपैकी एक आहे. काही माहिन्यांपूर्वीच उर्मिला आणि आदिनाथच्या जीवनात एक चिमुकली आली आहे. 


गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बारसं  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री उर्मिला कोठारे गरोदरपणाच्या काळतही खूप अ‍ॅक्टीव्ह होती. काही दिवसांपूर्वी उर्मिलाने तिच्या चिमुकलीची पहिली झलक सोशल मीडियामध्ये दाखवली होती. त्यावेळेस उर्मिला आईपण हा काळ एन्जॉय करतेय अशी पोस्ट तिनं केली होती.  


 



जिजा आदिनाथ कोठारे  


उर्मिला आणि आदिनाथच्या लेकीचं गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बारसं झालं. तिचं नाव जिजा ठेवण्यात आलं आहे. बारशाचे खास फोटो आदिनाथ आणि उर्मिलानं सोशल मीडियात शेअर केले आहेत. जिजा (Jiza)  हे शिवरायांंच्या आईचं नाव आहे. 


 



 


खास मराठमोळा अंदाज 


उर्मिला हिरव्या नऊवारी साडीत सोबत आदिनाथही फेटा बांधून पारंपारीक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये होता. या दोघांसोबतच त्यांची चिमुकली जिजादेखील परकर - पोलक्यामध्ये दिसत होती. जिजाचं सभागृहात स्वागतदेखील तुतारीच्या घोषात झालं.