मुंबई : कधीही 'रंगीला' सिनेमाची आठवण निघते तेव्हा सगळ्यांना उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आज उर्मिलाचा ४८ वा वाढदिवस. उर्मिलाने अनेक सिनेमांत काम केलं मात्र तिला लोकप्रियता ही 'रंगीला' सिनेमातून मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्मिलाने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केली. शेखर कपूर यांच्या 'मासूम' सिनेमातील अभिनय खूप चर्चेत आली. 


उर्मिला तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली. उर्मिलाच्या अफेअर्सची खूप चर्चा झाली. पण एका व्यक्तीमुळे उर्मिलाच आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. 


उर्मिला मातोंडकरने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली.


या चित्रपटानंतर उर्मिला मातोंडकरने कधीच मागे वळून पाहिले नाही. तेव्हापासून उर्मिला राम गोपाल वर्माच्या प्रत्येक चित्रपटात होती. रंगीला नंतर उर्मिलाला रंगीला गर्ल म्हणून ओळखले जायचे.


या कारणामुळे उद्धवस्त झालं करिअर 


राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांनी कधीही त्यांचे अफेअर स्वीकारले नाही. पण राम गोपालमुळेच उर्मिला तिच्या करिअरच्या शिखरावर पोहोचली होती. पण उर्मिलाचे करिअरही राम गोपाल वर्मामुळे बुडाले.


एक काळ असा होता की राम गोपाल वर्मा त्यांच्या प्रत्येक चित्रपटात उर्मिलाला कास्ट करायचे. दोघांनी 13 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. राम गोपाल वर्मासोबत काम केल्यामुळे इतर दिग्दर्शकांनी उर्मिलासोबत काम करण्यास नकार दिला. कारण राम गोपाल वर्मा यांच्यासोबत इंडस्ट्रीतील अनेक लोकांचा वाद होता. त्यांच्याशी कुणाचच जुळायचं नाही.