कोरोना पीडितांच्या मदतीसाठी पुढे आली उर्वशी रौतेला, अशी केली ५ कोटींची मदत
कोरोना पीडितांना उर्वशीचा मदतीचा हात
मुंबई : कोरोनाचा कहर जगभरात सुरु आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. रोजगार बंद असल्याने अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच बॉलिवूडचे अनेक कलाकार मदतीसाठी पुढे येत आहेत. उर्वशी रौतेला हिने देखील गरजुंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तिने "क्राय फाऊंडेशन आणि "स्वदेश फाऊंडेशनला आर्थिक मदत केली आहे.
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या चाहत्यांना तिच्या डान्स मास्टरक्लासबद्दल सांगितले होते. उर्वशीने ज्या लोकांना डान्स शिकण्याची इच्छा आहे आणि वजन देखील कमी करायचे आहे अशा सर्वांना डान्स शिकवला होता, ज्यामध्ये वेगवेगळे डान्स फॉर्म तिने दाखवले होते. डान्स मास्टर्सक्लासच्या माध्यमातून ती १८ मिलियन लोकांशी जोडली गेली. त्यातून तिने ५ कोटीची रक्कम ही जमवली. जे तिने कोरोना पिडीतांसाठी दिले.
भारतात अनेक कलाकार मदतीसाठी पुढे येत असताना उर्वशी रौतेला देखील पुढे सरसावली आहे. याआधी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर या सारख्या अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
लवकरच उर्वशी आणखी एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये विनीत कुमार आणि अक्षय ओबरॉय सोबत ती झळकणार आहे.