मुंबईः मिस दिवा युनिव्हर्स उर्वशी रौतेला तिच्या हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी उर्वशी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे...उर्वशीला बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूखसोबत रोमान्स करायचा आहे..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


17 एप्रिल रोजी बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत दिसली होती. तेव्हापासून चाहत्यांनी सोशल मीडियावर शाहरुखसोबत ट्रेंड केला आहे आणि त्या दोघांना पडद्यावर रोमान्स करताना पाहण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे.



याबाबत उर्वशीला विचारले असता ती म्हणाली, मला वाटते माझे चाहते माझ्यावर इतके प्रेम करतात की ते आता मला ओळखतात. मला खूप इच्छा आहे आणि शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळेल.



कोणत्याही अभिनेत्रीचं स्वप्न असतं की एकदा तरी शाहरूखसोबत सिनेमा करावा. आशा करुयात की माझं हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.



उर्वशीने मिस दिवा युनिव्हर्स 2015चा ताज जिंकला आणि नंतर मिस युनिव्हर्स 2015 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.  2021 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची ती पहिली सर्वात तरुण जजदेखील होती. 



उर्वशीचे सोशल मीडियावर 4.8 कोटी फॉलोअर्स आहेत. ती तिच्या चाहत्यांसोबत नेहमी कनेक्ट असते. तिला असं वाटतं की चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा सोशल मीडिया हा चांगला पर्याय आहे. उर्वशी तिच्या चाहत्यांना तिच्या कुटुंबातील सदस्यच मानते.