Rishabh Pant and Urvashi Rautela: रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला (Urvashi Rautela and Rishabh Pant) ही दोन नावं गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चांपासून ते अफेअरच्या चर्चांपर्यंत सगळीकडे त्यांच्याबद्दल बोललं गेलं आहे. आता पुन्हा एकदा रिषभच्या नावामुळे उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाही कारणं काहीसं तसंच आहे. (urvashi rautela open up about i love you video shares an instagram story)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशी कायमच आपल्या वैयक्तिक (Urvashi Rautela Personal Life) आयुष्यामुळे चर्चेत असते. हल्ली तिनं कोणतीही नवी पोस्ट शेअर केली की ती रिषभ पंतशी जोडली जाते. ती कुठेही गेली की ती रिषभ पंतसोबतच आहे असा संशयही अनेकदा तिच्या चाहत्यांकडून घेतला जातो. नुकतीच ती ऑस्ट्रेलियाला गेली (Urvashi Rautela in Australia) होती तेव्हाही असंच सांगण्यात आलं होतं की ती रिषभ पंतसोबत गेली होती. 


आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'


परंतु आता तिचा जो एक व्हिडीओ शेअर होत आहे त्यावरून तिला सगळीकडे ट्रोल करण्यात येत आहे. या व्हिडीओत ती कुणाला तरी आय लव्ह यू म्हणताना दिसते आहे. नेटझिन्सनी असा संशय व्यक्त केला आहे की, ती रिषभ पंतलाच आय लव्ह यू (I love You) म्हणताना दिसत आहे. परंतु आता यामागचं खरं कारण खुद्द उर्वशीनंच सांगितलं आहे. 




उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती सतत तिच्या चाहत्यांसोबत काहीतरी शेअर करत असते. तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती 'एक बार आय लव्ह यू कह दो... एक बार आय लव्ह यू बोल दो प्लीज' असे म्हणताना दिसतेय. उर्वशीने हा व्हिडिओ पोस्ट करताच इंटरनेटवर तो जोरदार व्हायरल झाला आहे. 


हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर (Urvashi Rautela Instagram Post) एक नोट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने या व्हिडिओमागचं (Video) सत्य सांगितले आहे. अभिनेत्रीने लिहिले, 'आजकाल माझा आय लव्ह यू व्हिडिओ व्हायरल होत आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की हा व्हिडिओ केवळ अभिनयापुरता होता. हे एका सीनसाठी केले गेले होते ना ते कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी होते किंवा हे व्हिडीओ कॉलवर रेकॉर्ड झालेले नाही, अशी माहिती तिनं इन्टाग्रामवरून दिली. 


आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे



उर्वशी रौतेला सध्या ऑस्ट्रेलियात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असंही कळले आहे की ती टीम इंडियाला चिअर करण्यासाठी तिथे गेली होती. मात्र, उर्वशी काही प्रोजेक्टच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाला गेल्याचे समजते आहे.