मुंबई : बॉलिवूडमधील बहुतेक सर्व सेलेब्रिटी कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी घरीच राहणं पसंत करत आहेत. देशभरात महत्त्वाच्या सेवा सोडून इतर दुकानं सरकारने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सेलिब्रिटी देखील घरीच वेळ घालवत आहेत. सर्व शुटींग रद्द असल्यामुळे कलाकार घरीच वेगवेगळ्या माध्यमातून वेळ घालवत आहेत. त्यातच उर्वशी देखील घरी असल्याने फिटनेसचं महत्त्व सांगत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे जिम देखील बंद आहेत. त्यामुळे कॅटरिना कैफ, मलायका अरोरा, जॅकलिन फर्नांडिज, उर्वशी रौतेलासह अनेक जण घरीच फिटनेसकडे अधिक लक्ष देत आहेत. आपल्या चाहत्यांनाही ते याचे धडे देत आहेत. 


अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या सोशल हॅन्डलवर कसरत कशी करायची आणि स्ट्रेचिंग करण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्री भिंतीच्या मदतीने कार्टवील मारताना दिसत आहे. तिला सहजतेने योगासन नियमित करतांना पाहिले जाऊ शकते ज्यामुळे शरिरात लवचिकता येते. या पोझला बॅक वॉकओव्हर म्हणतात असे तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे.



योगा आणि शारीरिक क्रिया करण्यासाठी आपन खुर्ची, सोफाचा आधार घेऊ शकतो, घरात बसल्या बसल्या स्क्वाट्स, पुशअप्स, ट्रायसेप डिप्स इत्यादी व्यायाम करू शकतात. यामुळे घरी राहून देखील फिट राहू शकतो. आपण इम्यून सिस्टिमला चांगलं ठेवण्यासाठी फळे, पाले भाज्या आणि ज्यूसचं सेवन करु शकत.