मुंबई : आपल्या अभिनयापेक्षा बोल्ड ईमेजसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेत असते. नुकताच उर्वशीने तिचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो व्हायरल होत आहे. हा बाथरूम मिरर सेल्फी आहे. या सेल्फीतील उर्वशीची स्टाईल पाहण्यासारखी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत कातिलाना अंदाज
या लेटेस्ट फोटोमध्ये उर्वशी रौतेला ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. या मिरर सेल्फीमध्ये उर्वशीने लाल स्कर्टसोबत लाल रंगाची बिकिनी घातली आहे. फोटोमध्ये, अभिनेत्री खुल्या केसांसह लाईट मेकअपमध्ये दिसत आहे.


फोटोवर लिहीलं खास कॅप्शन
उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिलं आहे की, 'आपल्या आत्मा आणि अंतरात्माला उडू द्या.'



उर्वशी रौतेलाने 'सिंह साहेब द ग्रेट' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात ती सनी देओलसोबत दिसली होती. ज्यामध्ये तिचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. याशिवाय तिने 'लव्ह डोस', 'लाल दुपट्टा', 'बिजली की तार', 'एक लडकी भीगी भागी सी', 'डूब गए' आणि 'वो चांद कहाँ से लगी' असे अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत. उर्वशी रौतेला लवकरच 'ब्लॅक रोज' या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.