Urvashi Rautela : आपल्या हटके आणि लक्झरीयस लाइफस्टाइलसाठी नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चर्चेत असते. उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वीच चर्चेत होती. त्याचं कारण तिच्या वाढदिवसाचा 24 कॅरेटचा गोल्ड केक. दरम्यान, सध्या उर्वशी ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे ती राजकारणात पदार्पण करण्याचा विचार करत आहे. उर्वशी रौतेलानं सांगितलं की तिला तिकिट मिळालं आहे, पण अजून तिनं विचार केलेला नाही. इतकंच नाही तर तिनं चाहत्यांकडे देखील याविषयी त्यांची प्रतिक्रिया मागितली आहे की तिनं राजकारणात जाऊन निवडणूक लढावी का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशी रौतेलानं 'इंस्टेंट बॉलीवुड' ला दिलेल्या मुलाखतीत निवडणूकीचं तिकिट मिळाल्याचं म्हटलं आहे. तिला जेव्हा विचारण्यात आलं की तिला पॉलिटिक्समध्ये किती आवड आहे आणि ती त्याला किती फॉलो करते. तर उर्वशीनं उत्तर दिलं की "मला आधीच तिकिट मिळालं आहे. आता मला निर्णय घ्यायचा आहे की राजकारणात जायचं आहे की नाही. मला माहित नाही की मी राजकारणात येणार की नाही, त्याचा मी अजून विचार केलेला नाही. मात्र, मला चाहत्यांकडून जाणून घ्यायचं आहे की त्यांनी मला सांगावं की मी राजकारणात प्रवेश करायला हवा की नाही. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये हे कळवू शकता."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


उर्वशीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी सांगितलं की उर्वशीनं राजकारणात जायला हवं. तर काही नेटकऱ्यांनी म्हटलं की ती ज्या प्रोफेशनमध्ये आहे, तिनं तिथेच रहायला हवं. इतकंच नाही तर काही नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला "तिला आता चित्रपटात काम मिळत नाही की काय?" दुसरा नेटकरी म्हणाला, "तुझं बॉलिवूडमध्ये करिअर झालं नाही, राजकारणात होईल?" तिसरा नेटकरी म्हणाला, "आम्हाला विकास झालेलं पाहायचं आहे, नग्नता नाही."


हेही वाचा : बॉलिवूडचे 'हे' कलाकर धुळवडीपासून राहतात दोन हात दूर, कारण...


उर्वशी रौतेलाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच JNU या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी काही चित्रपट असून 'ब्लैक रोज', 'दिल है ग्रे' आणि NBK109 आहेत. दरम्यान, त्यापैकी NBK109 विषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.