Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. उर्वशी ही सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशीनं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. उर्वशीन आयटम डान्स करत 'वाल्तेयर वीरैया' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटसृष्टीतून उर्वशीनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. प्रेक्षक तिच्या डान्स स्किलचे आणि एनर्जीचे कौतुक करत आहेत. याच दरम्यान, उर्वशीनं या आयटम सॉंगवर डान्स करण्यासाठी किती मानधन घेतले याची माहिती समोर आली आहे. उर्वशीनं तीन मिनिटांच्या या आयटम सॉंगसाठी घेतलेल्या मानधनाची एकूण रक्कम जाणून प्रेक्षकांना धक्का बसला आहे. कारण या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या प्रकाश राज (Prakash Raj) यांना देखील इतके मानधन देण्यात आले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार प्रकाश राज यांना या चित्रपटासाठी दीड कोटी रुपये मानधन म्हणून देण्यात आले. तर उर्वशीनं तीन मिनिटांच्या आयटम सॉंगसाठी दोन कोटी रुपये मानधन म्हणून घेतले. प्रकाश राज यांच्या पेक्षा जास्त मानधन घेतल्यामुळे उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'वाल्तेयर वीरैया' या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा तेलुगू चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटानं 10 दिवसात 200 कोटींचा गल्ला केला आहे. दरम्यान, सगळ्यात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये उर्वशी देखील दिसली होती. या दरम्यान, उर्वशीनं चिरंजीवी यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला. उर्वशीनं चिरंजीवी आशीर्वाद घेताच सोशल मीडियावर तिची स्तुती करण्यात आली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, काही दिवसांपासून उर्वशी भारतीय क्रिकेट पटू ऋषभ पंतच्या अपघातामुळे चर्चेत आली होती. असे म्हटले जाते की उर्वशी ऋषभला भेटायला रुग्णालयात देखील गेली होती. तर लवकरच उर्वशी रणदीप हुड्डासोबत एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. 


गेल्यावर्षी उर्वशी ही मिस यूनिवर्समध्ये जज होती. तर त्यानिमित्तानं किती मानधन घेतलं हा देखील चर्चेचा विषय होता. 


2021 साली मिस यूनिवर्सच्या जजच्या खुर्चीत बसलेल्या उर्वशीला 1.2 मिलियन डॉलर्स  मिळाले होते. याचा अर्थ उर्वशीला 8 कोटी रुपये मानधन म्हणून मिळाले होते. कदाचित उर्वशी सिनेमासाठी देखील एवढीच रक्कम आकारते. त्याचबरोबर उर्वशी देशाचं नाव देखील उंचीवर घेवून गेली आहे.