मुंबई : सोशल मीडियावर आणखी एक अभिनेत्री ट्रोल झाली आहे. अनेक अभिनेत्री फीटनेसच्या बाबतीत खूपच मेहनत घेताना दिसतात. अनेक जणी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट फीटनेससाठी काय काळजी घेतात. कशा प्रकारे वर्कआऊट किंवा योगा करतात याचे व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पण प्यार का पंचनामा फेक अभिनेत्री यावरुन ट्रोल झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फीटनेससाठी सोनाली सेहगलने एक व्हिडिओ (Sonali Seygall Viral Video) शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे ती चर्चेत तर आहेच पण ट्रोल देखील होत आहे. कारण ती बिकीनी घालून ट्रेनर सोबत योगा करत असल्याचं दिसत आहे. यावर य़ुजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


सोनाली सेहगलने (Sonali Seygall) प्यार का पंचनामा (pyar ka panchanama) सिनेमात काम केलं आहे. याच सिनेमातून तिने डेब्यू केले होते. त्यानंतर प्यार का पंचनामा 2 आणि सोनू के टीटू की स्वीटी सिनेमात ही ती दिसली होती. सोनाली सेहगल सिनेमा पेक्षा आता इन्स्टाग्रामवर व्हिडिओ मुळे अधिक चर्चेत असते. ती नेहमीच आपला फीटनेस चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ तिच्या चाहत्यांना आवडला नसल्याचं दिसतंय.



एका फॉलोअरने कमेंट करत म्हटले की, वाह बिकीनी योग, विचित्र लोकं आहेत भारतात. काही युजर्स ट्रेनरला लकी असल्याचं बोलत आहेत. अशा वेगवेगळ्या कमेंट करत युजर्सने तिला ट्रोल केले आहे.