मुंबई : मराठीतील चित्रपट व नाटक क्षेत्रातील दोन आघाडीचे कलाकार वैभव मांगले आणि प्रार्थना बेहेरे या दोघांनी काढलेली चित्रे आता पुण्यातील ई कॉमर्स कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आहेत. यातून मिळणारे सर्व उत्पन्न हे गरजू लोकांसाठी वापरण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट येऊन धडकली. सततच्या संकटांमुळे अनेक जणांचे जगणे अवघड झाले. मराठी नाट्य आणि चित्रपसृष्टी तरी याला मग अपवाद कशी असणार. गेल्या दीड वर्षेभर देशातील सर्व चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद आहेत. 



विंगेतून येणारा नांदीचा आवाज आता शांत आहे. तमाम रसिक आणि कलाकारांना आस लागली आहे ती, पडदा उचलला जाण्याची. पण रसिक आणि पडद्यावरील कलाकार या बरोबर आणखी एक मुख्य घटक या क्षेत्राशी जोडला गेला आहे तो म्हणजे पडद्यामागील कलाकार. जे कधीच तुमच्या-आमच्या समोर येत नाही आणि आले तरी आपण त्यांना ओळखत नाही. यात मग स्पॉट बॉय असतील, लाईटमन असेल, मेकअप आर्टिस्ट असतील.


या कलाकारांसाठी अनेक हात सरसावले आहेत, आपल्या विनोदी व त्याचबरोबर अलबत्या-गलबत्या या नाटकातील चेटकिणीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता वैभव मांगले आणि गोंडस व तितक्याच गोड चेहऱ्याची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. 


 या दोन्ही कलाकारांनी या दरम्यानच्या काळात अनेक सुंदर-सुंदर चित्रे काढली. आपल्यातील लपलेल्या गुणांना कागदावर उतरवले-रंगवले. आणि त्यातून येणारे सर्व पैसे हे समाज कार्यासाठी देण्याचे ठरविले. त्यांच्या याच उपक्रमात पुण्यातील एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म निऑम देखील सामील झाला. आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान राखत  निऑमच्या व्यवस्थापनाने येणारी सर्व रक्कम हि या दोन्ही कलाकारांना द्यावयाचा निर्णय घेतला.