मुंबई : सध्या  सर्वत्र ‘कौन बनेगा करोडपती 14’(KBC 14) शोची चर्चा सुरु आहे. 'कौन बनेगा करोडपती 14' ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जनरल नॉलेजवर (General Knowledge) या शोच्या हॉटसीटवर बसण्याची अनेकांची इच्छा असते. प्रश्न उत्तरांच्या या खेळात अनेकांच्या स्वप्नांना नवे पंख मिळतात, तर काहींच्या वाट्याला मात्र निराशा येते. दर आठवड्याला, KBC 14 मध्ये उपस्थित स्पर्धकांना 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' प्रश्न विचारला जातो. जो प्रश्नाचं लगेच उत्तर देतो, त्या स्पर्धकाला हॉटसीटवर बसण्याची संधी मिळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी वैष्णवी सिंग यांनी 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' प्रश्नाचं सर्वप्रथम उत्तर दिलं, त्यानंतर त्यांना हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. वैष्णवी व्यवसायाने कंटेंट रायटर आहे. अमिताभ बच्चन यांनी स्पर्धक वैष्णवी यांच्या सोबत 1 हजारांपासून गेमची सुरुवात केली. 



वैष्णवी यांनी सुरुवातीला सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. पण 1 लाख 60 हजार रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना अडचण आली. त्यामुळे त्यांना पुढे खेळता आलं नाही. 


बिग बी यांनी वैष्णवी यांना विचारलेला प्रश्न 
असा कोणता देश आहे जेथे एका शहराचे नाव बदलून तीन मूर्ती-हैफा स्क्वेअर चौक असे करण्यात आले आहे?


उत्तरासाठी पर्याय आहेत...
A. दक्षिण सुदान
B. दक्षिण आफ्रिका
c. जॉर्डन
D. इस्रायल


या प्रश्नाचं उत्तर  वैष्णवी सिंग यांच्यासाठी अत्यंत कठिण होतं. यासाठी त्यांनी लाईफ लाईनचा देखील उपयोग केला. प्रचंड विचार करुन वैष्णवी यांनी दुसरा पर्याय निवडलाय. पण प्रश्नाचं उत्तर पर्याय D इस्रायल होतं. 


1 लाख 60 हजार रुपयांच्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्यानंतर वैष्णवी खेळातून बाद झाला. ‘कौन बनेगा करोडपती 14’ खेळातून वैष्णवी फक्त 10 हजार रुपये जिंकू शकल्या.