मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत गेले काही काळ ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहाताहेत तो क्षण अखेर येऊन ठेपलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणाचा अपघात झाल्यानंतर त्याने शेती आणि कुस्तीची आशाच सोडली होती. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या राणाला अखेर या मातीनेच पुन्हा उठून उभं राहाण्याचं बळ दिलं. अंजली आणि गावकऱ्यांच्या साथीने राणा वज्रकेसरीसाठी पुन्हा उभा राहीलाय. 


येत्या २६ नोव्हेंबरला राणा आणि दलजितचा जंगी कुस्तीचा सामना रंगणारेय. अंजलीला वाढदिवसाची भेट म्हणून वज्रकेसरीची गदा आणण्याचा राणाचा निश्चय आहे. पण दलजितला हाताशी घेऊन नंदिताने काही नवे डावपेच आखलेत. अटीतटीच्या या सामन्यात हिमालयाला सह्याद्रीचा मावळा भिडणारेय. 




या महाएपिसोडसाठी १७ ते १९ नोव्हेंबरला कोल्हापूर जवळील इचलकरंजी इथे शूटिंग पार पडले. शूटिंगच्या पहिल्या दिवशी खऱ्या खुऱ्या पैलवानांच्या अनेक प्रदर्शनी कुस्तीही इथे झाल्या. राणा आणि दलजीतचा सामना पाहाण्यासाठी गावा गावातून लोकं आली असून या विशेष भागासाठी कुस्ती क्षेत्रात अढळ स्थान मिळवलेले काही दिग्गज मान्यवरही उपस्थित होते. उपस्तित दिग्गजांची यादी खालील प्रमाणे. दुखण्याला घाबरत नाही तो सच्चा पैलवान! त्यामुळे राणादा दलजितला धुळ चारत मैदान मारणार यात शंकाच नाही. हा अटीतटीचा सामना बघायला विसरू नका २६ नोव्हेंबर साध्य. ८ वा. फक्त झी मराठी आणि झी मराठी एचडी वर!



स्पेशल एपिसोडमध्ये यांचा असणार सहभाग 


रुस्तम ए हिंद, महान भारत केसरी पै. दादू मामा चौगुले
 हिंद केसरी पै. गणपतराव आंदळकर
 हिंद केसरी पै. दिनानाथ सिंह
 हिंद केसरी पै. योगेश दोडके
 डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील
 महाराष्ट्र केसरी पै. सईद चाऊस
 उपमहाराष्ट्र केसरी पै. रामा माने
 ऑलिंपिकवीर बंडा मामा रेठरेकर
 पै. मारुती मानुगडे
 पहिले हिंदकेसरी पै. श्रीपती तथा अण्णा खंचनाळे
 महापौर केसरी पै. अमृत भोसले तथा मामा भोसले
 प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी