Valentine's Day special : आज व्हॅलेंटाईन डे आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याची लव्ह स्टोरी ही आठवतेच. कशा प्रकारे आपली लव्ह स्टोरी सुरु झाली आणि आज आपण आपल्या साथीदारासोबत किती सुंदर आयुष्य काढतोय या सगळ्या गोष्टी आठवून आनंदी होतो. दरम्यान, या सगळ्यात आपलं पण कधीतरी हार्टब्रेक झालं असतं. असंच काही तरी भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सोबत झालं. दीदींच्या आवाजात साक्षात सरस्वती देवीचा अधिवास...त्यांनी अनेक भाषांमध्ये हजारो अविस्मरणीय गाणी गायली. आठ दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी 36 भाषांमध्ये 50,000 हून अधिक गाणी गायली आहेत. आजही त्यांचा अविस्मरणीय ठेवा रसिकांनी जपून ठेवला आहे.  इतकंच काय तर त्यांनी लग्न का नाही केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर लता दीदी यांचे कोणावर प्रेम होते? इतकंच काय तर प्रेम होतं तर लग्न का नाही केलं, असा प्रश्न होता. (Lata Mangeshkar Love Story)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लताजींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. लता दीदी यांच्या घरची परिस्थिती चांगली नसल्यानं  त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. दीदींनी त्यांच्या मेहनत आणि जिद्दीनं स्थान मिळवले. लता दीदींना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि त्यानंतर 2001 साली त्यांना भारतातील सर्वात मोठा पुरस्कार भारतरत्न देत सन्मानित करण्यात आले होते. (Lata Mageshkar Love Life) 


हेही वाचा : Valentine's Day : प्रेमासाठी 'या' कलाकारांनी केली हद्द पार; कोणी रक्तानं लिहिलं पत्र, तर कोणी संपूर्ण शरीरावर काढले टॅटू


लता दीदींचे फक्त भारतात नाही तर परदेशातही चाहते होते. मग त्यांनी लग्न का केलं नाही? लता दीदी देखील कोणावर तरी प्रेम करायच्या मात्र, त्यांची ही लव्ह स्टोरी अर्धवट राहिली. रिपोर्ट्सनुसार, लता मंगेशकर या डुंगरपूर राजघराण्यातील महाराजा राज सिंह (Maharaja Raj Singh) यांच्यावर प्रेम करत होत्या. एका बातमीत तर असे म्हटले आहे की, राज सिंग यांनी त्यांच्या आई-वडिलांना वचन दिले होते की, ते कोणत्याही सामान्य कुटुंबातील मुलीशी लग्न करणार नाही आणि त्यामुळेच महाराजा राज सिंह शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आई-वडिलांच्या जवळ राहिले आणि दिलेल्या वचनाचे पालन करत राहिले. महाराजा राज सिंह हे लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचे चांगले मित्र होते, असे म्हटले जाते.  


महाराजा राज सिंह यांना क्रिकेटची आवड होती. ते जवळपास 16 वर्षे फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. यानंतर महाराजा राज सिंह 20 वर्षे भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) शी जोडलेले होते. दोन टर्म मध्ये नॅशनल टीमसाठी सिलेक्टर म्हणून काम केले होते आणि भारतीय संघाचे चार वेळा फॉरेन्ट मॅनेजमेंट केले. दरम्यान, विकीपिडियानं दिलेल्या वृत्तानुसार ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य देखील होते. (Who Is Lata Mangeshkar's Love Of Life) 


दरम्यान, एक माहिती अशी देखील आहे की लता दीदींचे म्हणने होते की त्यांच्यावर असलेल्या घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी लग्न केले नाही. लता दीदींवर अत्यंत लहान वयात घरातील मोठ्या जबाबदाऱ्या आल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी लग्न केलं नाही.