मुंबई : Valentines Day 2020च्या निमित्ताने आज अनेकजण त्यांच्या प्रियजनांकडे प्रेमाची ही सुरेख भावना व्यक्त करत आहेत. काहीजण त्यांच्या आठवणीत रममाण आहेत, तर काहींनी हा दिवस आणखी कोणत्या नव्या पद्धतीत साजरा करण्याचा मार्ग अवलंबला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Valentines Day 2020च्या या उत्साही वातावरणात, प्रेमाच्या या खास दिवशी सेलिब्रिटींच्या प्रेमकहाण्या आणि त्यांना पाहताक्षणी भावलेल्या काही खास व्यक्तींबद्दल जाणून घेण्यासाठीही अनेकांणध्येच कुतूहल पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया बॉलिवूडमध्ये शहेनशाह, महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांना भावलेल्या अशा एका खास व्यक्तीबद्दल, अर्थात 'तिच्या'बद्दल. 


काही दिवसांपूर्वी खुद्द बिग बींनी एका कार्यक्रमात त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांची आठवण सांगता या गोष्टीता खुलासा केला होता.


'मी तीन मूर्ती परिसरात राहायचो आणि नेहमीच्या प्रवासाठी बसचा वापर करायचो. ही बस संसद, कनॉट प्लेस अशा भागांतून जाऊन मग पुढे मला ज्या ठिकाणी उतरायचं असायचं तेथे सोडत होती. तेव्हा या वाटेत कनॉट प्लेस थांब्यापासून मिरांडा हाऊस, आयपी कॉलेज येथे काही सुंदर मुली बसमध्ये चढायच्या. त्यामुळे हा स्टॉप कधी येतो आणि त्या कधी एकदा बसमध्ये चढतात याचीच आम्ही वाट पाहत असायचो', असं बिग बींनी सांगितलं होतं. 


पाहा : #ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बच्चन यांना नोकरी मिळाली, तेव्हाच बसमधून प्रवास करणाऱ्या त्याच सुंदर मुलींपैकी एक मुलगी त्यांना पुन्हा भेटली. त्यावेळी त्या मुलीकडेही आपल्याला सांगण्याजोग्या खूप गोष्टी होत्या असं त्यांनी सांगितलं. मुख्य म्हणजे त्या मुलीच्या सांगण्यानुसार ती आणि तिच्या मैत्रीणीसुद्धा अमिताभ बच्चन त्या बसमधून कधी येणार याची वाट पाहत असायच्या. ती बस थांब्यावर तिच्या प्राण नावाच्या एका मित्रासोबत बससाठी थांबायची.  जेव्हा जेव्हा बस यायची तेव्हा तेव्हा तिच्या मनात एकच विचार यायचा, 'प्राण (तिचा मित्र) जाए पर, बच्चन ना जाए.....'.  



काही नाती ही काही खास दिवसांना उगाचच आठवणींच्या या दुनियेत डोकावतात आणि  नकळतच पुन्हा एकदा काही खास व्यक्तींच्या आठवणीत रममाण करुन जातात. बिग बींसाठी ही त्यापैकीच एक आठवण असावी.