मुंबई : वाणी कपूरने काल नुकताच आपला 33 वा वाढदिवस साजरा केला आहे. सध्या बेलबॉटम सिनेमामुळे चर्चेत असलेली वाणी कपूर, सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे, ती तिच्या आगामी मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये सध्या खूप व्यस्त आहे. बेलबॉटमनंतर वाणी आता शमशेरा या तिच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ज्यात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. त्यानंतर वाणी आयुष्मान खुरानासोबत त्याच्या 'चंदीगड करे आशिकी'मध्ये दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2013 मध्ये शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वाणी कपूरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनय कारकीर्द सुरू करणाऱ्या वाणीने कधीच मागे वळून पाहिले नाही.


तिने बॉलिवूडच्या सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. रणवीर सिंगसोबत 'बेफिक्रे' असो किंवा हृतिक रोशनसोबत 'वॉर' असो, वाणीने तिच्या अभिनयाने सर्वांना खूष केले आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की फिल्म इंडस्ट्रित येण्यापूर्वी वाणीचा बॉलिवूडशी यापूर्वी कधीही संबंध नव्हता.


चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी वाणी हॉटेलमध्ये काम करायची. दिल्ली ते बी-टाऊन असा वाणीचा प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


वाणीचा जन्म 23 ऑगस्ट 1988 रोजी दिल्लीत झाला. तिचे वडील शिव कपूर यांचा दिल्लीत फर्निचरचा व्यवसाय आहे. तर आई डिम्पी कपूर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. वाणी कपूरने तिचे संपूर्ण शिक्षण दिल्लीतूनच केले आहे.


वाणी कपूरने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पर्यटन विषयात पदवी प्राप्त केली आहे. पर्यटनाचा अभ्यास केल्यानंतर तिने जयपूरच्या ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये इंटर्नशिप केली आणि नंतर आयटीसी हॉटेलमध्येही काम केले.


जेव्हा वाणीला हॉटेलमधील काम सोडून मॉडेलिंगमध्ये आपले नशीब आजमावायचे होते, तेव्हा तिचे वडील मॉडेलिंगच्या विरोधात होते. पण तिला तिच्या आईने तिला पाठिंबा दिला. त्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला. ज्यामुळे टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये तिला अभिनयाची संधी देखील मिळाली.


वाणीने तिच्या कारकीर्दीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईला स्थलांतर केले आणि अनेक ऑडिशन्स दिल्या. त्यानंतर तिला शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारही मिळाला आहे.