Vanita Kharat: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची. यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा आली आहे. 14 ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. त्यामुळे मालिकेची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे वनिता खरात हिची. वनिता खरात ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे ती तिच्या हटके अभियनसाठी आणि स्टाईल अन् बेधडकपणासाठी ओळखली जाते. वनिताची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. ती आपल्या प्रेक्षकांना फार कायमच अपडेट ठेवताना दिसते. सध्या तिनं इन्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे ज्याची जोरात चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे. सासूबाई आणि सूनचं नातं हे फारच खास असतं. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यातून सध्या तिनं जो फोटो शेअर केला आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईलच की तिचं आणि तिच्या सासूबाईंचं नातं किती छान आहे ते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा टीव्ही सिरिजल्समध्ये दाखवलं जातं की सासू सूना या कायमच भांडत असतात. त्यातून एकमेकींच्या विरोधात त्या काहीतरी कटकारस्थानंही करताना दिसतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मग असं पाहून कदाचित काही सासू सूना या स्वत:हूनही काहीतरी करायला लागतात. अशावेळी चर्चा असते म्हणजे त्यांच्या या कटकारस्थानंचीच. परंतु सासू सून काही अशाच असतात असं नाही. त्यांच्यात तर अनेक चांगल्या गोष्टीही असतात. त्या कायमच वेगवेळ्या गोष्टी या करताना दिसतात. एकमेकींसोबत अनेकदा एकत्र फिरायला जाणं, गप्पा मारणं, चॅटिंग करणं, शॉपिंग करणं, त्याचसोबत एकमेकांची सुख दु:ख शेअर करताना दिसतात. त्यातून एकमेकींसाठी काहीतरी खास शेअरही करताना दिसतात. 


हेही वाचा : सनी देओल आणि डिंपल कपाडिया पुन्हा दिसले एकत्र; पुन्हा जुन्या फोटोची आठवण


सध्या वनिता खरात हिनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिनं एका पदार्थाचा फोटो टाकला आहे आणि त्यात तिनं सासूबाईंचा उल्लेख केला आहे. यावेळी तिनं लिहिलं आहे की, ''सासूबाईंचे प्रेम आणि पुढे लिहिलं आहे की, Love You मम्मे''. 



यावेळी सासूबाईंनी तिच्यासाठी खास अशी कटाची आमटी आणि पुरणपोळी केली होती. त्याचा फोटो तिनं शेअर इन्टाग्राममध्ये शेअर केला आहे. आपल्याला माहितीच आहे की वनिताचे काही दिवसांपुर्वीच लग्न केले. तिच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.