मुंबई : अभिनेता वरूण धवण आणि अभिनेत्री नोरा फतेही यांचा डान्स व्हिडीओ सध्या भलताचं व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये हे दोघे 'दिलभर' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा  व्हिडीओ शेअर केला. वरूण धवण सध्या 'कलंक' चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे. तगडी स्टार कास्ट असलेला 'कलंक' चित्रपट १७ मार्च रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. 



                                                                     
नोरा फतेही, वरूण धवण आणि श्रद्धा कपूर त्यांचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डान्सर 3 डी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. 'स्ट्रीट डान्सर 3 डी' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'एबीसीडी २' चित्रपटाचा सीक्वेंस असणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून वरूण - श्रद्धची जोडी चांगलीच गाजली होती. दिग्दर्शक रेमो डी-सूझा दिग्दर्शित 'स्ट्रीट डान्सर 3 डी' टी-सिरीज द्वारा निर्मित करण्यात येणार आहे. या सिनेमात प्रभू देवा, शक्ति मोहन आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'स्ट्रीट डान्सर 3 डी' चित्रपट ८ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.