मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. बॉलिवूडच्या एका विशिष्ट गटाकडून कंगणाला टार्गेट केलं जात असताना त्याच गटातील एका कलाकाराने कंगनाला पाठिंबा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना क्लबमध्ये आता अभिनेत वरुण धवनची एन्ट्री झालीय. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरुन ज्युनिअर धवनने एका अवॉर्ड कार्यक्रमा दरम्यान कंगनाची विकेट घेतली होती. पण त्यानंतर वरुणने कंगनाची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. 


वरुणने कंगनाची बाजू घेत बॉलिवूडमध्ये घराणेशाही चालते हे मान्य केलंय. वरुणचा 'जुडवा २' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे... त्यामुळे वरुणला कुठल्याही प्रकारे वादग्रस्त विधान करुन कुठल्याही वादात अडकण्याची इच्छा नाही.


वरुण घराणेशाहीवर तर बोललाच शिवाय त्याची गर्लफ्रेण्ड नताशावरही वरुण बोलला. एवढचं काय वरुणने या कार्यक्रमात स्टार्सची मिमिक्रिही केली...


'जुडवा २'मध्ये वरुणचा ड्रामा-रोमान्स आणि कॉमेडी तर त्याच्या फॅन्सला बघायला मिळणार आहे. शिवाय या सिनेमात वरुणने अनेक अॅक्शन सीन्सही केले आहेत. वरुणचा असा अवतार त्याच्या फॅन्सनं कदाचिता याआधी कधीही पाहिला नसेल...