मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता या यादीमध्ये अभिनेता वरूण धवनचा सुद्धा लवकरच समावेश होणार आहे. बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोन, प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूर नंतर आता वरूण बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. वरूण आणि त्याची गर्लफ्रेंड अनेक वर्षांपासून एकमेंकाना डेट करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या दोघांच्या कुटुंबाकडून लग्नाच्या तयारीला जोमाने सुरूवात झाल्याचे कळत आहे. काही नातेवाईकांच्या उपस्थित त्यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे स्वागत सोहळ्यात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना आमंत्रण देण्यात येणार आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. गत वर्षी या दोन प्रेमी युगूलांनी गुपीत रित्या साखरपुडा केल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या मंगल समयी फक्त कुटुंबातील व्यक्ति उपस्थित असल्याचे सांगण्यात आले होते. 


वरूण-नताशा नोव्हेंबरमध्ये लग्न गाठ बांधणार आहेत. वरूण सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. 'कलंक' चित्रपटाला अपयश मिळाल्यानंतर आता तो 'स्‍ट्रीट डन्सर' चित्रपटात भूमीका साकारणार आहे. त्याचप्रमाणे तो 'कुली नंबर १' चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे.