वरूणचं कोरोनावर मात करणारं रॅप ऐकलात का...
कोरोना विषयी समाजात जागृतता पसरवण्यासाठी कालाकारांनी देखील एक पाऊल पुढे टाकलं आहे.
मुंबई : जगभरात सध्या कोरोनासोबत दोन करण्यासाठी नागरिकांना अनेक सल्ले दिले जात आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाला हरवण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन घोषित केलं आहे. पण नागरिकांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाकडे काहींनी मात्र पाठ फिरवली आहे. आता समाजात जागृतता पसरवण्यासाठी कालाकारांनी देखील एक पाऊल पुढे टाकलं आहे. अभिनेता वरूण धवनने त्याच्या अनोख्या अंदाजात चाहत्यांना घरातच सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. त्याने कोरोना विरोधात आणि लॉकडाउनला पाठिंबा देणारा एक रॅप तयार केला.
वरूणच्या या अनोख्या रॅपची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने होत आहे. या व्हिडिओची चर्चा संध्या चांगलीच रंगली आहे. व्हिडिओमध्ये त्याने सोशल डिस्टंसिंगला सुद्धा प्राधान्य दिलं आहे. चाहत्यांबरोबरच कलाकारांनी देखील त्याच्या या अप्रतिम रॅप व्हिडिओचं कौतुक केलं आहे. वरूणने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
आतापर्यंत त्याचा हा व्हिडिओ ८ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी बघीतला आहे. याआधी वरूणने जनता कर्फ्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तो व्हिडिओ शेअर करत त्याने 'जनता कर्फ्यू मोठ्या काळासाठी असायला हवा होता अशी इच्छा व्यक्त केली होती.
कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. परंतू त्याचं गांभिर्य लोकांना अद्यापही नाही. अजूनही नागरिक बाहेर मोकळे फिरताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तर आता हा विषाणू कधी संपूर्ण जगातून नष्ट होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.