Varun Dhawan Birthday Baby John New Poster : 'स्टुडंट ऑफ द इअर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून वरुण धवनने अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वरुण धवन हा आजच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. वरुण धवन आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या वरुण धवन हा त्याच्या 'बेबी जॉन' (Baby John New Poster) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी वरुण धवनला वाढदिवसाचे खास सरप्राईज दिले आहे. वरुणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'बेबी जॉन' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.


निर्मात्यांनी वरुण धवनला दिले खास सरप्राईज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बेबी जॉन' या चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'बेबी जॉन' चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. या पोस्टरला हटके कॅप्शनही देण्यात आले आहे. "वरुण धवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 'बेबी जॉन' हा चित्रपट पाहण्यासाठी सज्ज व्हा. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला", असे कॅप्शन निर्माते मुराद खेतानी यांनी दिले आहे. 


या पोस्टरवर वरुण धवनचा शर्टलेस लूक पाहायला मिळत आहे. त्यासोबतच लांब केस आणि दमदार शरीरयष्टी असा अनोख्या लूकमध्ये वरुण धवन दिसत आहे. यात वरुण धवन हा भर पावसात एका माणसाला मारत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर 'बेबी जॉन' असे लाल अक्षरात लिहिण्यात आले आहे. या पोस्टरवरुन या चित्रपटात दमदार अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. 



पहिल्या पोस्टरची रंगली चर्चा


'बेबी जॉन' या चित्रपटाची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती. यानंतर आता या चित्रपटातील वरुण धवनची पहिली झलक समोर आली आहे. सध्या वरुण धवनच्या 'बेबी जॉन' या चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 


दरम्यान 'बेबी जॉन' या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. कालीस्वरन यांनी केले आहे. तर याची निर्मिती मुराद खेतानी आणि एटली यांनी केली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबतच किर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे किर्ती सुरेश ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.