मुंबई : 'सुई धागा' या सिनेमात अनुष्का शर्मा ही ममताची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरमध्ये दिसणार अनुष्काचे एक्सप्रेशन सध्या सोशल मीडियावर युझर्सला खास मीम्स बनवायला भाक पाडत आहे. मात्र अनुष्काने कधी हा विचार केला नसेल की, तिचे को स्टार देखील मीम्स बनवतील किंवा तिची मस्करी उडवतील. अनुष्काला विश्वास बसणार नाही की, वरूण धवनने तिची मस्करी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरूण धवनने अनुष्का शर्माचा व्हायरल होणारा मीम असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रियंका चोप्रा निकसोबत एका मुंबईतील अनाथाश्रमात गेला होता. जिथे निकने या मुलांसाठी एक गाणं देखील गायलं आहे. हा व्हिडिओ एडिट केला असून ममता म्हणजे अनुष्का शर्मा आहे. हा व्हिडिओ वरूण धवनने शेअर केला आहे. 



वरूण धवन आणि अनुष्का शर्माचा 'सुई धागा - मेड इन इंडिया'हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच याची चर्चा सुरू झाली. या सिनेमातील मीम्स इतके व्हायरल होत आहेत की, हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.