Varun Dhawan Trolled for Airport Look: सध्या बॉलिवूडमध्ये आपल्याला सेलिब्रेटींच्या मार्फत अतरंगी फॅशन पाहायला मिळते आहे. त्यामुळे सेलिब्रेटी हे अनेकदा ट्रोलही होताना दिसतात. अशावेळी समोर नावं कुणाचे येते तर रणवीर सिंगचे. रणवीरच्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे तो कायमच चर्चेत असतो. रणवीर सिंगचं नावं आलंच तर त्यांच्या अतरंगी फॅशनचीही चर्चा होताना दिसते. परंतु आता या अतरंगी फॅशनच्या लिस्टमध्ये अनेक बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी हे सामील होताना दिसत आहेत. त्यातून आता नेटकऱ्यांच्या ट्रोलिंग लिस्टवर वरूण धवलही (Varun Dhawan Fashion) सामील झाला आहे. नुकताच तो एका ठिकाणी स्पॉट झाला आहे. ज्यात त्याची फॅशन पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. परंतु नक्की काय घडलंय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी वरूण धवन हा एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. यावेळी तो आयफासाठी निघाला होता. तेव्हा त्याच्या फॅशनची यावेळी बरीच चर्चा झाली. यंदाचा आयफाचा दिमाखदार सोहळा हा दुबईमध्ये संपन्न होतो आहे. अनेक सेलिब्रेटी हे दोन दिवसांपुर्वी आयफासाठी (iifa in Dubai) रवाना झाले आहेत. तेव्हा सगळीकडेच चर्चा रंगली आहे ती म्हणजे आयफाची. यावेळेच आयफा हा अत्यंत वेगळा आणि दिलखेचक असणार आहे. तेव्हा हा सोहळा अधिक रंगतदार बनवण्यासाठी कलाकारही सज्ज झाले आहेत. दोन दिवसांपुर्वी अभिनेता वरूण धवनही आयफासाठी (iifa 2023 Varun Dhawan) रवाना झाला होता परंतु दुबईच्या एअपपोर्टवर पोहचल्यावर मात्र त्याची फॅशन पाहून सगळेच अवाक झाले. 


हेही वाचा - ''गांधीजी वाईट नव्हते पण...'' रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित


यावेळी त्यांनं पांढरी बिनयन आणि शॉर्ट्स (Baniyan and Shorts) घातली होती. तर सोबतच सनग्लासेस लावले होते आणि पायात पांढरे शूज आणि गळ्यात जेन घातली होती. तेव्हा असं हे आऊटफिट परिधान केल्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी सपाटून ट्रोल केले आहे. तेव्हा यावेळी त्याच्या या आऊटफिटनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. हल्ली सोशल मीडियावर अशाप्रकारे कलाकारांचे एअरपोर्ट लुक चांगलेच व्हायरल होताना दिसताता सोबतच हे कलाकारही प्रचंड ट्रोल होतात. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्रा त्यांच्या बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल झाली होती. यावेळी ती उप्स मुमेंटचीही शिकार झाली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या वरूणच्या या व्हिडीओवर अनेकांच्या विचित्र कमेंट्स येताना दिसत आहेत. अनेकांनी त्याला उर्फीकडून प्रेरणा घेत असल्याचे म्हटले आहे. एकानं लिहिलंय, ''वरूण भाई बहुतेक तुम्ही उर्फीकडून फॅशन टीप्स घेत आहात.'' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, ''बहुतेक याला कपडे कमी पडले.'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''पाहा अशा सेलिब्रेटींना लोकं देव मानतात.'' तर एक नेटकरी म्हणाला की, ''रूपा बिनियानची जाहिरात जास्त पाहिली की हे असं होतं.''