मुंबई : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने पोल डान्स शिकायला सुरुवात केली आहे. ती नियमितपणे पोलवर योग करत असते. तिच्या शरीराची लवचिकता, बॅलन्सिंग बघून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. कौतुकच नव्हे तर काहींसाठी ती प्रेरणा ठरत आहे. 


तिच्याकडून प्रेरणा घेत वरुणने देखील पोल योगाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. आणि त्याबद्दल त्याने तिचे आभार देखील मानले आहेत.