मुंबई - एबीसीडी आणि एबीसीडी-२च्या यशानंतर आता एबीसीडी-३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणला सुरूवात होणार आहे. चित्रपटाची टीम पंजाबमध्ये दाखल झाली असून, चित्रीकरणापूर्वी गोल्डन टेम्पलमध्ये आशीर्वाद घेतल्यानंतर चित्रीकरण सुरू होणार आहे. एबीसीडी-३ चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत असणाऱ्या वरूण धवनने गोल्डन टेम्पल येथील फोटो त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. वरूणने पंजाबला शूटिंगसाठी रवाना होण्यापूर्वीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. एबीसीडी-३ चित्रपटाचे चित्रीकरण अमृतसरमध्ये होणार आहे. तर चित्रपटाचा काही भाग इंग्लंडमध्ये चित्रीत केला जाणार आहे. डान्सवर आधारित असणारा एबीसीडी-३ ८ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक रेमो डिसूजाने काही दिवसांपूर्वी वरूण धवनच्या चित्रपटासाठी करण्यात येणाऱ्या नवीन लूकचा व्हिडिओही शेअर केला होता. वरूण धवनने नुकतेच त्याच्या 'कलंक' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून आजपासून एबीसीडी-३ च्या चित्रीकरणास सुरूवात होत आहे.



हिंदी सिनेमामध्ये केवळ नृत्यावर आधारित फारसे चित्रपट आलेले नाहीत. पण रेमोने एबीसीडीच्या सिरिजमुळे ही सारी गणितं बदलली आहेत. 'एबीसीडी३'मुळे पुन्हा नृत्यप्रेमींना रेमो आणि वरुण या जोडीची कमाल पाहायला मिळणार आहे.