VED Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) 'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. खासगी आयुष्यात सगळ्यांची चाहती असणाऱ्या या जोडीनं मोठ्या पडद्यावरही जादू केली आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना खरंच वेड लावलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलीजच्या 10-12 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचा हा दुसरा आठवडा सुरु असताना चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला आहे. रितेश आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपटानं प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारीच 5.70 कोटींची कमाई केली आहे. (Genelia and Riteish Deshmukh's Ved Box Office Collection) 


चाहत्यांमध्ये 'वेड' या सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रितेश-जिनिलियादेखील आपल्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. 'वेड' या सिनेमाद्वारे जिनिलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. तर रितेश देशमुखने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.   या सिनेमाची निर्मिती 15 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने कमाईच्या दुप्पट कमाई कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 35 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून रितेश-जिनिलियाचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होऊन आता 15 दिवस होत आले असले तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. 


 हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिज पाहणाऱ्या तरुणांना सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम करतो आहे. सिनेमासह या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'वेड' या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीला मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत.


या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) केलं आहे. या चित्रपटातून जिनिलियानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयानं हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'वेड' या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर अनेक कलाकार आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. तर जिनिलिया या चित्रपटाची निर्माती आहे.