जयंती वाघदरे, झी मीडिया, मुंबई : आज बिग स्क्रीनवर एक दोन नाही तर तब्बल 8 सिनेमे प्रदर्शित झालेत. यात पाच मराठी आणि तीन हिंदी सिनेमांचा समावेश आहेत. सुरुवात करुया करिना कपूर, सोनम कपूर, स्वारा भस्कर, शिका तलसानिया स्टारर वीरे दी वेडिंग या सिनेमापासून.. कसा आहे वीरे दी वेडिंग, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी...जाणून घ्या...


कथा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत राहणा-या चार मुलींची ही गोष्ट आहे., एकाच शाळेत शिकणा-या या चार मुली जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. काही वर्षांनी या चौघींचं आयुष्य बदलून जातं.. या चौघी, कालिंदी अर्थातच करीनाच्या लग्नासाठी एकत्र भेटतात.. एकत्र आल्यानंतर यातल्या प्रत्येकीची एक वेगळी गोष्ट समोर येते.. सिनेमात अनेक ट्विस्ट अँन्ड टर्न्स येतात, अखेर शेवटी काय घडतं, यासाठी तुम्हाला 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा पहावा लागेल.


आधुनिक युगातल्या या चार मुलींची ही गोष्ट आहे, आयुष्य आपल्या पद्धतीनं आपल्या मर्जीनं जगण्याचा प्रयत्न करत असताना अनेक बंधनं आणि अनेक फुकटचे सल्ले या चौघींना मिळत राहतात.. सिनेमाचं लिखाण खूप छान आहे.. सिनेमातील डायलॉग युथ अपिलींग आहेत. करीना, सोनम, स्वरा आणि शिखा चौघींनी आपापल्या व्यक्तिरेखा चोख पार पाडण्याचा प्रयत्न केलाय.


असा आहे सिनेमा


सिनेमात ड्रामा आहे, ह्युमर आहे, सिनेमातील सिनेमाटोग्राफी, दिग्दर्शनही छान झालंय. 'वीरे दी वेडिंग'मधले डायलॉग्स आणि कंटेन्ट बॉल्ड असल्यामुळे सिनेमाला A सर्टिफिकेट देण्यात आलंय. त्यामुळे एका ठराविक वर्गासाठी हा सिनेमा आहे, यात शंका नाही.. सिनेमाचा पूर्वार्ध जास्त चांगला झालाय.. उत्तारार्धात मात्र सिनेमा जरा कंटाळवाणा जाणवतो.. सिनेमाचा क्लायमॅक्सही आणखी चांगला करता आला असता..


वीरे दी वेडिंगची गाणी सध्या चार्टबस्टर ठरतायेत.. तारीफां, लाज शरम, वीरे ही गाणी चांगलीच हिट झालीयेत.. 


या सिनेमाला मिळतायत ३ स्टार्स