मुंबई : प्रियंका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' सिनेमातील एका कलाकाराचं निधन झालं आहे. सिनेमात दादाची भूमिका साकारलेल्या अभिनेता संजीव शाह यांच २७ ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. गुजराती नाटकांत अभिनेता आणि सिनेनिर्माते म्हणून संजीव शाह कार्यरत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजीव यांचे गेल्या कित्येक दिवसांपासून ब्रेन स्ट्रोक झाले होते. तसेच त्यांना फुफ्फुसाचा देखील त्रास होता. संजीव हे उत्तम मराठी बोलत असतं. त्यांनी व्हेंटिलेटर सिनेमात साकारलेली भूमिका चर्चेत आली होती. तसेच 'राऊंड टेबल इंडिया' या मार्फत सामाजिक कार्यात सहभागी होते. 



वयाच्या ६० व्या वर्षी संजीव यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेकांसाठी ही धक्कादायक बाब आहे. दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी देखील सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 



राजेश मापुस्करांनी संजीव शाह यांना आदरांजली वाहत 'व्हेंटिलेटर' सिनेमातील शुटिंगच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'दादा' या भूमिकेसाठी अनेक मराठीतील दिग्गज व्यक्तींचा विचार करूनही संजीव शाह यांना ही भूमिका कशी मिळाली आणि त्यांच्यासोबतचा कामाचा अनुभव या पोस्टमध्ये शेअर केला आहे.