Zeenat Aman Ranveer Singh: सध्या सर्वत्र हवा आहे ती म्हणजे Don 3 या चित्रपटाची. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणवीर सिंगची. रणवीर सिंग आपल्या हटके अभिनयानं प्रेक्षकांची मनं ही जिंकून घेतली आहेत. आता आपल्याला तो नव्या भुमिकेतून लवकरच दिसणार आहे. 2025 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची घोषणा फरान अख्तरनं नुकतीच केली आहे. सध्या या चित्रपटाचा पहिला लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यापुढे आता शाहरूख खानला पाहायला मिळणार नाही. यासाठी अनेक चाहते हे उदासही झाले आहेत. त्यातून रणवीर सिंग दिसणार यामुळे अनेकजण हे एक्साईटही झाले आहेत. तेव्हा या पहिल्या लुकला अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. परंतु यावेळी फार मोठ्या अशा अभिनेत्रीची रणवीरला शाबासकीची थाप मिळाली आहे. त्यामुळे सध्या याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता शाहरूख खान यांच्यानंतर रणवीर सिंग हा आपल्या समोर एका वेगळ्या भुमिकेतून येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी आपल्या या चित्रपटाच्या घोषणेनंतर अभिनेता रणवीर सिंग यानं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपल्या लहानपणाचे फूल स्टाईलमधले, गॉगल वैगेरे लावलेले डॅशिंग फोटो हे शेअर केले आहेत. तेव्हा यावेळी त्याने प्रेक्षकांना आपल्या या नव्या भुमिकेतून त्यांचे मनोरंजन करणार असल्याचे वजन दिले आहे तर यावेळी त्यानं डॉनच्या मेकर्सचे आणि फरान अख्तरचे आभारही मानले आहेत. त्यामुळे त्याची ही इन्टाग्राम पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यावेळी त्याच्या या पोस्टला 11 लाख लोकांनी लाईक केले आहे आणि यावेळी रितेश देशमुख, झोय अख्तर, अमृता खानविलकर, युट्युबर लिली सिंग, हृता दुर्गुळे, सिद्धार्थ जाधव यांनी कमेंट केली आहे. परंतु डॉन या 1978 साली आलेल्या चित्रपटातील लोकप्रिय नायिकेनं आशीर्वाद दिले आहेत. 


हेही वाचा - टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध कपलनं ठेवलं आपल्या बाळाचं युनिक नावं; हनुमानाशी आहे खास कनेक्शन


यावेळी रणवीरनं पोस्ट केलेल्या या फोटोखाली 1978 साली आलेल्या डॉन या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी कमेंट केली आहे. सध्या या कमेंटकडे सगळ्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी झीनत अमान म्हणाल्या की, रणवीर तुझे अभिनंदन, 'मला आशा आहे की तुला लवकरच जंगली बिल्ली मिळो'.



नुकताच रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.