Bollywood Comedy Kindg Johnny Lever Birthday: बॉलीवूडमध्ये असे किती कॉमेडियन्स आले आणि गेले परंतु ज्या विनोदवीरांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले त्यांचा संघर्षही फार सोप्पा नव्हता. त्यातीलच एक नाव आहे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते जॉनी लिव्हर यांचे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या टॅलेंटने त्यांनी आजपर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. प्रचंड संघर्षानंतर आणि घेतलेल्या अपार कष्टानंतर आज त्यांनी बॉलीवूडमध्ये आपली अशी एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच आज त्यांना बॉलीवूडमध्ये कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखले जाते. त्यांचे कॉमेडीचे टायमिंग आणि विनोदशैलीमुळे त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. 


आज या हरहून्नरी बॉलीवूड कॉमेडी किंगचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या संघर्षाबद्दलची ही एक गोष्ट वाचून तुम्हाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आंध्रपद्रेश येथे जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव असे आहे. जॉनी हे मुंबईच्या धारावीतच लहानाचे मोठे झाले. 


त्यांचे शिक्षण हे फक्त सातवीपर्यंत झाले आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण पुर्ण करता आले नाही. पैसे कमवण्यासाठी कधी रस्त्यावर सेलिब्रेटींची नक्कल करून, हिंदी गाण्यांवर नाचून त्यांनी कामं केली आहेत. कधी काळी ते रस्त्यावर पेन विकूनही पैसे कमवायचे. 


जॉनी लीव्हर चित्रपटातील सेलिब्रेटींच्या नकला करायचे. ते स्टॅण्ड कॉमेडी करायचे. सुरूवातीला त्यांच्या स्टेज शोज्सना प्रचंड लोकप्रियता मिळाली. ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त असेच एका त्यांच्या शोमध्ये पोहचले होते. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांनी जॉनी यांना 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात पहिला ब्रेक दिला. त्यानंतर जॉनी लिव्हर यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 


जॉनी यांनी आत्तापर्यंत 'चालबाज', 'मिरॅकल', 'बाजीगर', 'राजा हिंदुस्तानी', 'जुदाई', 'येस बॉस', 'इश्क', 'वर राजा', 'कुछ होता है', 'अनाड़ी नंबर 1', 'कहो ना प्यार है', 'नायक', 'कभी खुशी कभी गम', 'फिर हेरा फेरी', 'गोलमाल 3' , 'गोलमाल अगेन', 'हाऊसफुल 4' अशा अनेक चित्रपटांतून आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे. 


आज किती आहे जॉनी लिव्हर यांची संपत्ती?
जॉनी लीव्हर 1982 पासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून 64 वर्षीय जॉनी लीव्हर आजही तितक्याच उत्साहाने चित्रपटांतून आपल्या विनोदी भुमिका निभावत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार जॉनी यांची एकूण संपत्ती $30 दशलक्ष एवढी असण्याची शक्यता आहे.