मुंबई :  भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये डिस्को किंग म्हणून कमाल लोकप्रियता मिळवणाऱ्या गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांनी काही महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतला. आपल्या अफलातून संगीतावर बप्पी दांनी सर्वांनाच थिरण्यास भाग पाडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बप्पी लहिरी हे एक असं व्क्तीमत्त्वं जे कोणत्याही कार्यक्रमाला गेलं असता त्या ठिकाणी निखळ आनंदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचा शिरकाव होता होत नाही. आता हे नेमकं का आणि कसं हे आतापर्यंत तुम्हाला कळलं असावं. 


बप्पी दा यांनी कायमच त्यांचा लूक हटके असावा यासाठीच प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. विविध प्रकारचे गळ्यातील हार, चैनी, अंगठ्या, सोन्याची फ्रेम असणारा चष्मा, सोन्याची नक्षी असणारे कोट आणि बरंच काही... ही त्यांची आणखी एक ओळख. 


जेव्हा या महान कलाकाराचं निधन झालं, तेव्हा अर्थातच चाहत्यांना दु:ख झालं. नकळतच काहींच्या मनात एका प्रश्नानं घरही केलं. हा प्रश्न होता, बप्पी दांच्या दागिन्यांचं पुढे काय ? 


या महान कलाकाराच्या मुलानं आणि कुटुंबानं यासंदर्भातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. 


बप्पा लहिरी यानं सांगितल्यानुसार या दागिन्यांचा वारसदार ठरवण्यापेक्षा ते एका संग्रहालयात ठेवण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबानं घेतला आहे. ज्यामुळं चाहत्यांना त्यांच्या दागिन्यांचं कलेक्शन पाहण्याची संधी मिळेल. 


काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार बप्पी दांकडे 754 ग्रॅम सोनं आणि 4.62 किलो चांदी होती. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा 20 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. एका अमेरिकन पॉप स्टारवर असणाऱ्या प्रेमापोटी बप्पी दांनीही त्याच्याप्रमाणंच सोन्याचे दागिने घालत आपली वेगळी ओळख तयार केली होती.