मुंबई : ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन झालं आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून होत्या आजारी होत्या. दीनानाथ मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी संगीत नाटकांत कीर्ती शिलेदार यांनी मोलाचं काम केले आहे. संगीत नाटकांची परंपरा जिवंत ठेवण्यात त्याचं योगदान मोठं आहे. दिवंगत नाट्य अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयराम आणि जयमाला शिलेदार यांची कन्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी दिलेलं योगदान कधीही विसरता येवू शकत नाही. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलं नाही.


जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता. 2018 मध्ये त्यांनी 98व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.