मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळू शकते. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान सोशल मीडियावर अनेक मेसेजसही व्हायरल झाले आहेत. बॉलिवूडमधूनही अनेक कलाकारांनी ट्विट करून चिंता व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार डॉ. फारूख उद्वाडीया आणि डॉ. प्रतित समधानी यांनी लतादीदींवर उपचार केले.  प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.