Aditya Narayan: बॉलीवूडमध्ये कोणाचं करिअर कसं वर येईल आणि कोणाचं करिअर कसं खाली जाईल याची काहीच खात्री देता येत नाही. त्यातून स्ट्रगल केल्यावरही अनेकांना यश मिळत नाही आणि एकदा यश मिळालं की ते पुष्कळ मिळतं. त्याचबरोबर करिअर मधून ब्रेक घेतल्यानंतरही काही कलाकारांना त्यातूनही चांगली कामं मिळतात तर काहींना ब्रेकनंतरही (Bollywood Celebs) कामं मिळत नाहीत असेही चित्र असते. (vetern singer udit narayan son aditya narayan he is not getting in work after taking break from hosting entertainment breaking news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंच काहीसं लोकप्रिय कलाकाराच्या मुलाबाबत झाले आहे. गेली 15 वर्षे तो बॉलिवूड इंडस्ट्रीत आहे. म्युझिक रिएलिटी शोच्या (Music Reality Show) सुत्रसंचालनामुळे त्याचं नावं घराघरात पोहचले आहे. त्याच नावं आहे आदित्य नारायण (Aditya Narayan), प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा (Udit Narayan Son). रामलीला (Ramleela) या चित्रपटातील त्याची गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. 


आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय


आदित्य नारायणनं अनेक लोकप्रिय चित्रपटातून गाणी गायली आहेत. त्यातून त्यानं काही चित्रपटांतून अभिनयही केला आहे. परंतु त्याला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली ती संगिग रिएलिटी शोचे सुत्रसंचालन करूनच. परंतु मोठमोठ्या चित्रपटांतील गाण्याचे पार्श्वसंगीत करूनसुद्धा मात्र त्याला सुत्रसंचालनावरच (Aditya Narayan Hosting) समाधान मानावे लागत आहे. आत्तापर्यंत सुत्रसंचालनामुळेच त्याला अधिक लोकांपर्यंत पोहचता आलं आहे. 


परंतु आता काही वेगळं करावं म्हणून आदित्य नारायणनं सूत्रसंचालनापासून ब्रेक (Aditya Narayan Break) घेतला आहे. त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की तो आता सारेगमपा या हिंदी संगीग रिएलिटी शोमधून ब्रेक घेत आहे. माझं 2022 हे वर्षे शेवटचं होतं यापुढे माझा परत सुत्रसंचालनाकडे वळण्याचा विचार नाही. इंडियन आयडॉलच्या नव्या पर्वाचेही तो सुत्रसंचालन करणार नसल्याचे त्यानं जाहीर केले आहे. 


आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!





आदित्य नारायण हा बालकलाकार म्हणून (Aditya Narayan Child Artist) चित्रपटसृष्टीत आलेला आहे. 1995 साली त्यानं रंगीला (Rangeela) या चित्रपटात काम केलं होतं त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या चित्रपटातून त्यानं भुमिका केल्या होत्या आणि शेवटी आपल्या संगीत कारकीर्दीलाही त्यानं सुरूवात केली. 2007 साली त्यानं रिएलिटी शोचं सुत्रसंचालन करायला सुरूवात केली.