नवऱ्याला चप्पल मारल्याने अंकिता लोखंडेवर संतापली विकी जैनची आई, सासूला चिडलेलं पाहून घाबरली अभिनेत्री
Ankita Lokhande-Vicky Jain Bigg Boss 17: अंकिता आणि विकी जैन यांच्यात झालेल्या वादावर संतापली विकीची आई. सासुबाईंना चिडलेलं पाहून घाबरली अंकिता लोखंडे.
Ankita Lokhande-Vicky Jain Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे दोघे ही सध्या ‘बिग बॉस 17’ च्या घरात आहेत. पहिल्या दिवसापासून ते दोघं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. कधी ते एकमेकांवर प्रेम करताना दिसतात तर कधी एकमेकांशी भांडताना दिसतात. नुकत्याच झालेल्या विकेंड स्पेशल एपिसोडमध्ये अंकिता आणि विकीच्या आईनं हजेरी लावली होती. शोच्या सुरुवातीला त्या दोघी मुलांशी खूप छान बोलताना दिसतात आणि त्यानंतर ते भावूक देखील झाले. तर विकीची आई त्याच्यावर आणि अंकिताला ओरडू लागली.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अंकिताची आई त्या दोघांना एकत्र नीट राहण्यासाठी आणि शो जिंकण्याचा सल्ला दिला आहे. तर विकीची आई त्या दोघांच्या भांडणाला कंटाळून रडू लागते. व्हिडीओत विकीला रडताना पाहून त्याची आईला चिंता वाटू लागते आणि अंकिताला ओरडू लागते.
व्हिडीओत पाहू शकतो की शोमध्ये अंकिता जवळ बसलेला विकी त्याच्या आईला बोलतो की आई, सगळे मला चुकिचं समजत आहे. विकीची आई त्याला शांत होण्यासाठी सांगते. त्यानंतर ती अंकिता आणि विकीला बोलते की तुमचं घरात कधीच भांडण झालं नाही. अंकिता लात मारते, चप्पल मारते. त्यावर अंकिता बोलते की आई मी आहे ना त्याला सांभाळायला. अंकिताचं हे वक्तव्य ऐकूण तिची सासू बोलते, नाही, तू सांभाळत नाही आहेस. सासुकडून मिळालेली ही रिअॅक्शन पाहून अंकिता नाराज झाल्याचे पाहायला मिळते. तिला अश्रू अनावर होतात.
हेही वाचा : बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या 'या' मुलीला ओळखलंत का! अक्षयपासून संजय दत्तपर्यंत अनेकांशी जोडलं नाव
दरम्यान, लक्षवेधी गोष्ट म्हणजे बिग बॉस 17 च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये त्या घरातील इतर स्पर्धक विकी आणि मुनव्वर फारुखीची बाहुली म्हणतं आहेत. सलमान खाननं त्यावर त्याला काय वाटतं हे देखील सांगितलं. त्याशिवाय त्याला त्याच्या गेमविषयी पण सांगितलं. हे पाहता त्या घरातील लोकांनी विकीला खूप सुनावलं. तर विकीची आई सलमान खानला सांगताना दिसली की जेव्हा पासून बिग बॉस सुरु झालं आहे तेव्हा पासून विकीला या शोमध्ये यायचं होतं. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की एकमेकांवर इतक प्रेम करणारे शोमध्ये आल्यानंतर इतके बदलीतल असं आम्हाला वाटलं नव्हतं.