विकी कौशलचे चाहते चिंतेत; अखेर कारण समोर
लवकरच विकी कौशलही एका प्रवासाला निघणार आहे.
मुंबई : अजय देवगणच्या Into the Wild with Bear Grylls या एपिसोडला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता विकी कौशलही एका प्रवासाला निघणार आहे. विकी कौशल 'Into the Wild with Bear Grylls' मध्ये दिसणार असून त्याचा फर्स्ट लुक देखील रिलीज करण्यात आला आहे. हा भाग १२ नोव्हेंबरला डिस्कव्हरी प्लसवर रिलीज होईल. अशाप्रकारे, विकी कौशलबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत आणि चाहते त्याच्या लग्नाबद्दल जोरदारपणे त्याचे पाय खेचत आहेत.
त्याचबरोबर काही चाहते बेअर ग्रिल्सच्या बॉलीवूड प्रेमाची खिल्ली देखील उडवत आहेत. Man vs Wild यामध्ये पीएम नरेंद्र मोदी, सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण देखील दिसले आहेत. या एपिसोड्सचं यश पाहून आता या शोमध्ये विकी कौशल दिसणार आहे.
इतकंच नाही तर लोकं बेअर ग्रिल्सची खिल्ली उडवत आहेत एका युजर्सने कमेंट करत म्हटलं आहे की, काही दिवसांनी बेअर ग्रिल्सही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचं दिसत आहे. ये भालू भैया को बॉलीवूड चित्रपट दे, यार. त्याचबरोबर एका चाहत्याने कतरिना कैफसोबतच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त करत लिहिलंय की, 'सुरक्षित परत ये. लग्न करायचं आहे. अशाप्रकारे, विकी कौशलचा बेअर ग्रिल्ससोबतचा संबंध सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्यामुळे या शोचा उत्साह चाहत्यांमध्ये दिसत आहे.