मुंबई : विकी कौशल आणि फातिमा सना शेख लवकरच 'सॅम बहादूर' चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात सान्या मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. महान लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी आणि फातिमा या दोघांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलीकडेच, दोन्ही स्टार्स चित्रपटाचं शेड्यूल संपवून मुंबईला परतले. फ्लाइटमध्ये दोघांनी त्यांचे काही मजेदार सेल्फीही क्लिक केले.


फातिमा सना आणि विकी कौशलचा मजेदार सेल्फी
फातिमा सना शेखने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तुम्हाला विकी कौशल आणि अभिनेत्री  मजेदार चेहरे करताना दिसत आहेत. हा दोन फोटोंचा कोलाज आहे. दोन्ही फोटोंमध्ये हे स्टार्स फनी चेहरे करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत फातिमाने लिहिलं आहे की, 'थोडं वेडं होणं आवश्यक आहे'. सोशल मीडियावर यूजर्स या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. दोघांच्या या मजेदार सेल्फीवर प्रत्येकजण हार्ट इमोजी पाठवत आहे.


सॅम बहादूरमध्ये ही जोडी दिसणार आहे.
वर्क फ्रंटवर बोालायचं झालं तर, विकी कौशल 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात भूमि पेडणेकर आणि कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. याशिवाय तो सारा अली खानसोबत लक्ष्मण उतेकरच्या अनटायटल चित्रपटातही दिसणार आहे. हा अभिनेता आनंद तिवारीच्या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि एमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत. विकीचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.


दुसरीकडे, फातिमा सना शेखबद्दल बोलायचं झालं तर ती तरुण दुडेजा दिग्दर्शित 'धक-धक' या चित्रपटात दिसणार आहे. तापसी पन्नू, प्रांजल खगडिया आणि आयुष माहेश्वरी या चित्रपटाची सहनिर्माती करत आहेत.