शूटिंग दरम्यान विकी कौशलला झालेली अटक? खावी लागली तुरुंगाची हवा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आपल्या अभिनयाच्या जोरावर विकीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आत्तापर्यंत विकीने एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल बॉलिवूड इंडस्ट्रीतला आघाडीचा अभिनेता आहे. विकी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नुकताच अभिनेत्याने त्याचा 36 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर विकीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आत्तापर्यंत विकीने एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहे. विकीच्या वाढदिवसानिमीत्त विकीचे अनेक किस्से कालपासून चर्चेत होते. त्यातलाच एक किस्सा म्हणजे विकी सिनेमाच्या सेटवर असताना वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
तुम्हाला माहितेय का एकदा विकी कौशलला पोलिसांनी पकडलं होतं आणि इतकंच नाहीतर त्याला तरुंगाची हवाही खावी लागली होती. नुकताच हा किस्सा फिल्ममेकर अनुराग कश्यप यांनी कपिल शर्मा शोमध्ये सांगितला. २०१२ साली आलेला 'गँग्स ऑफ वासेपूर' हा सगळा प्रकार घडला. त्यावेळी विकी कौशल अनुरागला असिस्ट करत होता. या सिनेमात मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हुमा कुरेशी यांच्या भूमिका होत्या.
यावेळी बोलताना अनुराग कश्यप यांनी सांगितलं की, 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या दरम्यान परवानगी न घेता एका लोकेशनवर शूटिंग सुरू केलं होतं. तेव्हा शूटिंग करत असताना आम्हाला कळले की, हे अवैध वाळू उत्खनन ठिकाण आहे. माफिया तेथे वाळू उत्खनन करत होते आणि त्याचवेळी पोलिस आले आणि विक्कीलाही अटक केली गेली'. यासोबत एकदा नाहीतर विकी दोनदा तुरुंगात गेल्याचं अनुरागने सांगितलं.
अनुराग कश्यप, पीयूष मिश्रा, हुमा कुरेशी, पंकज त्रिपाठी आणि मनोज बाजपेयी यांच्यासोबत कपिल शर्माच्या शोच्या या एपिसोडमध्ये सहभागी झाले होते. अनुराग कश्यपचा 'गँग्स ऑफ वासेपूर' हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा भाग २ देखील २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. आजही प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतो.
विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, विकी लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहे. त्याने करिअरच्या सुरुवातीला त्याने 'मसान' सिनेमा केला होता, त्यातला त्याचा साधेपणा लोकांना खूप आवडला होता. याचबरोबर विकीचे 'राझी', 'उरी', 'मनमर्जियां', 'जरा हटके जरा बचके', 'संजू', 'सरदार उद्यम सिंग' आणि 'सॅम बहादूर' हे सिनेमा खूप हिट झाले होते.