Vicky Kaushal Spotted Video : रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट नुकताच रिलिज आहे. त्या चित्रपटाला मात्र चाहत्यांनी फार थंड प्रतिसाद दिला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही. त्यामुळे चार वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणारा रणबीर मात्र या चित्रपटाच्या अपयशामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाला घेऊन बॉलीवूडने चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु वास्तविक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच फिका ठरल्याने बॉलीवूडने केलेली स्तुती ही नेटकऱ्यांसाठी गंमतीचा विषय ठरली आहे. त्यामुळे सेलिब्रेटी जसे 'शमशेरा'ची भरपूर स्तुती करत आहेत तसे ट्रोलर्स मात्र या सेलिब्रेटींना जबरदस्त ट्रोल करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या ट्रोलर्सच्या निशाण्यावर अभिनेता विकी कौशल आहे. नुकताच विकी कौशल याने 'शमशेरा' हा चित्रपट पाहिला असून त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. नुकताच विकी कौशल हा 'शमशेरा' चित्रपट पाहून झाल्यावर मुंबईतल्या एका थिएटरबाहेर स्पॉट झाला. तेव्हा त्याच्याभोवती मीडियाने गराडा घातला होता. त्याला 'शमशेरा' चित्रपट कसा वाटला यावर त्याची प्रतिक्रिया विचारली असता त्याने मौन पाळले आणि काहीही न बोलता विकीने हाताने थंब्स अपची खूण केली. हे पाहून 'शमशेरा' चित्रपट आवडला असल्याची बातमी नेटकऱ्यांनी हेरली. परंतु हे पाहून नेटकरी विकीला प्रचंड ट्रोल करू लागले. 


विकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे तेव्हा विकीच्या प्रतिक्रियेवरून त्याला ट्रोल करण्यासाठीही ट्रोलर्सने मागेपुढे पाहिलेले नाही. या व्हिडीओच्या खाली असंख्य कमेंट्स आल्या आहेत. त्याखाली एका युझर्सनं कमेंट केली आहे, ''चल झूठा!!!'' तर दुसऱ्या एका ट्रोलरने 'शमशेरा'ला ''flop movie'' असंच जाहीर केलं आहे. तर तिसऱ्याने असं लिहिले आहे की, ''हा विकी कौशल आपल्या बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडचा सिनेमा पाहायला का गेला होता?'', असा प्रश्नच एका ट्रोलरने उपस्थित केला आहे. 



विकी कौशलला नुकतीच इंडस्ट्रीत 7 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्याने 'मसान' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.