देखते ही रह जाओगे... पाहा असा होता विकी- कतरिनाच्या लग्नात पाहुण्यांचा राजेशाही थाट
नाव घ्याल ती सेवा हजर...
जयपूर : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबरला लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स येथे त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. या लग्नसोहळ्यासाठी दोघांकडूनही खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यामधीत एका पाहुणीनं म्हणजेच विकीच्या बहिणीनं अतिशय आकर्षक असा व्हिडीओ शेअर केला आहे.
डॉ. उपासना वोहरा असं विकीच्या बहिणीचं नाव. तिनं लग्नसोहळ्यानंतर रुम टूर देत कतरिना- विकीच्या लग्नात पाहुण्यांसाठी नेमकी कोणती व्यवस्था करण्यात आली होती, याची झलक दाखवली. (Katrina kaif vicky kaushal)
अरुणेंद्र कुमारने त्याच्या युट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या माध्यमातून ते ज्या रुममध्ये थांबले होते त्याची झकल दिसत आहे. चेंजिंग एरिया, मोठा पलंग, पांढऱ्या शुभ्र रंगाचे पडदे, चादरी, खिडकीतून दिसणारं विहंगम दृश्य अशी एकंदर त्या रुमची रचना.
अपमान करणाऱ्यांना पंकज त्रिपाठींकडून ही कशी वागणूक? पाहून तुम्ही काय म्हणाल?
विकी आणि कतरिनानं ज्याप्रमाणे आपलं लग्न अगदी राजेशाही थाटातच व्हावं यासाठी व्यवस्था केली. त्याप्रमाणे त्यांनी पाहुण्यांसाठीसुद्धा सोय केली.
इतकंच नव्हे, तर लग्नसोहळ्यासाठी वेळात वेळ काढून आलेल्या पाहुण्यांना त्यांनी एक सदिच्छा भेट देत त्यांचे आभारही मानल्याचं पाहायला मिळालं.