मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या बातम्या जोर धरुन आहेत. या लग्नाच्या बातमीवर दोन्ही स्टार्सनी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही, पण लग्नाचे ठिकाण आणि मेनू समोर येत आहे. दरम्यान, आता दिवाळीनिमित्त विक्की कौशलच्या आईने कतरिना कैफसाठी खास गिफ्ट पाठवल्याचे समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनाला खास भेट


बॉलीवूड कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ हे त्यांच्या प्रेमकथेमुळे सतत चर्चेत असतात. दरम्यान, आणखी एक बातमी समोर आली आहे. एका पोर्टलरच्या रिपोर्टनुसार, विकी कौशलच्या आईने त्यांची भावी सून कतरिनाला काही खास भेटवस्तूंसोबत एक लिफाफा पाठवला आहे.


दोघेही दिवाळी पार्टीत एकत्र


वास्तविक, नुकतेच कतरिना कैफ आणि विकी कौशल आरती शेट्टीच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीत एकत्र पोहोचले होते. या प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये कतरिना गुलाबी रंगाच्या साडीत आणि विकी कौशल गडद निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. पण या फोटोंमध्ये अशीच एक गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.