`Katrina Kaif साठी मी Perfect पती नाही...`, Vicky Kaushal नं का केलं असं वक्तव्य?
Vicky Kaushal नं त्याच्या आणि कतरिना कैफच्या वैवाहिक जीवनाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.
Vicky Kaushal on his Married Life : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. विकी कौशल आणि कतरिना हे दोघे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ते दोघे एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी ते नेहमीच मोकळेपणानं बोलताना दिसतात. दरम्यान, विकी कौशलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की कतरिनासाठी तो परफेक्ट नवरा नाही, पण तो रोज स्वत: परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतो.
नुकतीच विकीनं लाइफस्टाइल एशियाला एक मुलाखत दिली होती. यावेळी विकीनं कतरिनासोबत लग्नानंतर त्याचं आयुष्य कसं होतं याविषयी खुलासा केला. "जेव्हा तुम्ही एकटे राहता आणि मग लग्नानंतर तुमच्या आयुष्यात खूप काही बदलते. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहू लागते, यामुळे समोरची व्यक्ती एखाद्या परिस्थितीत कशा प्रकारे विचार करते हे शिकायला मिळते."
पुढे या विषयी सांगताना विकी म्हणाला, "लग्नानंतर माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी चांगल्या होत आहेत. नीट सांगायचं झालं तर, एक माणूस म्हणून तुम्ही लग्नानंतर खूप समजुतदार होतो. असं समजा की तुमच्याकडे रंगांचा एक बॉक्स आहे आणि लग्नानंतर दुसरी व्यक्ती रंगाचा दुसरा बॉक्स घेऊन आली की तुमच्याकडे दुप्पट त्यासोबत आणखी वेगळे रंग होतात आणि हे सगळ्यात आश्चर्यकारक आहे."
पुढे कतरिनासाठी तो पर्फेक्ट नवरा नाही असं सांगत म्हणाला, सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मी एक पर्फेक्ट नवरा किंवा मग पर्फेक्ट मुलगा नाही. पण मी रोज त्या दोघांसाठी पर्फेक्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतो. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे झाला.
हेही वाचा : शॉर्ट ड्रेसमुळे Alia Bhatt च्या नाकीनऊ; Oops Moment पासून वाचण्यासाठी सतत करु लागली 'हे' काम!
दरम्यान, कतरिना कैफचा 'भूत पुलिस' (Bhoot Police) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. तर लवकरच तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' (Tiger 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 'टायगर' (Tiger) या फ्रेन्चायझीचा तिसरा भाग आहे. तर या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ एकत्र दिसणार आहेत