शॉर्ट ड्रेसमुळे Alia Bhatt च्या नाकीनऊ; Oops Moment पासून वाचण्यासाठी सतत करु लागली 'हे' काम!

Alia Bhatt चा हा कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आलिया Oops Moment चा शिकार होता होता कशी वाचली ते दिसत आहे.

Updated: Feb 2, 2023, 10:34 AM IST
शॉर्ट ड्रेसमुळे Alia Bhatt च्या नाकीनऊ; Oops Moment पासून वाचण्यासाठी सतत करु लागली 'हे' काम! title=

Alia Bhatt Oops Moment : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलिया आई झाली असून मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलियानं  नोव्हेंबर 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) मुलीचे नाव राहा आहे. राहाच्या जन्मानंतर ते दोघेही तिच्यासोबत जितका मिळेल तितका वेळ व्यथित करताना दिसत आहेत. सध्या राहाच्या जन्मानंतरच्या काळाचा आनंद आलिया घेत आहे. नुकताच आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत Oops Moment ची शिकार होण्यापासून वाचण्यासाठी आलिया कशा प्रकारे तिचा ड्रेस सांभाळते ते समोर आले आहे. 

आलिया भट्टनं नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी आलियासोबत अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) देखील होता. प्रेग्नंसीनंतर आलिया पहिल्यांदा इतक्या बोल्ड अंदाजात दिसली होती. आलिया यावेळी परिधान केलेल्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत असली तरी ती त्यात फारशी कम्फर्टेबल नव्हती. या शॉर्ट ड्रेसमध्ये Oops Moment ची शिकार होण्यापासून वाचण्यासाठी सतत एकच गोष्ट करत राहिली आणि आलियाचे ते कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आलियाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओत आलिया आणि वरुण एकमेकांशी बोलताना दिसत आहे. यावेळी आलिया सतत तिचा हात मांडीसमोर ठेवताना दिसते. आलिया असं का करते असा प्रश्न तुम्हाला आला असेल तर तिचे अंडरगार्मंटंस दिसायला नको म्हणून ती असं करत आहे. 

हेही वाचा : मी कसे पण पैसे कमावेल तुम्हाला काय? Anurag Kashyap च्या लेकीचा वडिलांनाच उलट सवाल

या कार्यक्रमात आलियाला काही पत्रकारांनी राहाच्या जन्मानंतर तिच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो का? त्यावर उत्तर देत आलिया म्हणाली की "हे शक्य आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिली प्रायॉरिटी ही माझी मुलगी आहे. तिच्यावर माझे खूप प्रेम आहे. पण माझे पहिले प्रेम चित्रपट आहे आणि ते माझे काम देखील आहे. त्यामुळे मी प्रयत्न करेन. कदाचित येणाऱ्या काळात माझे काम हे क्वांटीटी पेक्षा क्वालिटीला प्राधान्य देणारे असू शकते आणि ही काही चुकीची गोष्ट नाही." 

दरम्यान, कामाविषयी बोलायचं झालं तर, आलिया भट्ट करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंग दिसणार आहे. तर याशिवाय आलिया 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार असून यात तिच्यासोबत प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत. याशिवाय लवकरच आलियाचा हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' प्रदर्शित होणार आहे. आलियाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट आहे.